भर पावसाळ्यात पाण्यासाठी आणीबाणी, आदिवासीबहुल टेकाबेदर गावचा पाण्यासाठी संघर्ष
भर पावसाळ्यातही घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच पायपीट करावी लागत असल्याचे दाहक वास्तक गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील टेकाबेदर गावात पाहायला मिळत आहे.
गोंदिया : भर पावसाळ्यातही घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच पायपीट करावी लागत असल्याचे दाहक वास्तक गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील टेकाबेदर गावात पाहायला मिळत आहे. गावात पाण्यासाठी नागरिकांत आणीबाणी पाहावयास मिळत आहे. Struggle For Water Gondia Tekabedar Village
गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबाहुल टेकाबेदर गाव. या गावात भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असे मानताच सर्वांचे कान उभे राहणारचं…. होय मात्र हे खरे आहे. या गावातील नागरिकांची गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे… टेकाबेदर या गावात 1979 साली सर्वप्रथम बोरवेल खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली…
आणि गावात पाण्याची समस्या निर्माण झाली!
कालांतराने लोकसंख्या वाढली त्यामुळेच पुन्हा गावात 4 बोरवेल खोदून गावाला पाणी पुरवठा करणयात येत होता… 1999 मध्ये प्रथम खोदलेल्या बोरवेलमध्ये नळयोजना प्रस्तावित करून गावात नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता…. त्यामुळेच गावाला 2019 पर्यंत पाण्याची कोणतीही अडचण भासली नाही… मात्र गावातीलच एक दोन नागरीकांनी सार्वजनिक नळ योजनेच्या बोरवेल जवळच स्वतःच्या मालकीची 350 फूट खोल बोरवेल खोदली आणि गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आणि तेव्हा पासूनच पाण्याचा टाकीत पाण्याचा पुरवठा कमी होऊन गावात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे…
सार्वजनिक नळावर महिला पुरुषांसह लहाण मुलांच्या रांगा
सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात धान रोवणीचे काम सुरु आहे. तेव्हा पहाटेपासूनच कामाच्या लगबगीत नागरीकांची गावातील एकमेव सार्वजनिक नळावर महिला पुरुषांसह लहान बालकांच्या रांगाच रांगा दिसून येतात. कधी कधी तर पाण्याचा संघर्ष एवढा शिगेला जावून पोहचतो की एक घागरभर पाण्यासाठी तंटेसुद्धा झाल्याचे पाहावयास मिळतात. निसर्गाने नाही तर गावातील एक दोन नागरिकांमुळे गावात पाणी संकट उभे राहिले… आज गावातील नागरिक आपली तहान भागविण्यासाठी शेतातील बोरवेलचे पाणी पिण्यासाठी आणतात, पण हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? याची जाणीव त्यांनाही नाहीय…।
राजकारण्याचं साफ दुर्लक्ष
भर पावसाळ्यातही जर टेकबेदरच्या नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असेल तर ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ ही म्हण तंतोतंत या गावासाठी लागू पडत असून नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आलेली असतांना दुसरीकडे मात्र याबाबत छोट्या-छोट्या गोष्ठीसाठी रस्त्यावर उतरणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि सामजिक संघटना पाणी टंचाईबाबत मात्र गप्प असल्याचे पाहून या गावाला खरंच कोणी वाली उरलंय काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
हे ही वाचा :
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता RTO मध्ये खेटे घालण्याचा ताप वाचणार
औरंगाबादमध्ये तिरपी बस बेदरकारपणे दामटवणाऱ्या एसटी बसचालकावर अखेर गुन्हा