Nandurbar Bhim Army : राजस्थानात शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, नंदुरबार येथे भीम आर्मीतर्फे निषेध मोर्चा
या आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांवर भारतीय कायद्यानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नंदुरबार भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली.
नंदुरबार : राजस्थानातील जालोर जिल्ह्यात थरारक घटना घडली. नऊ वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्या शिक्षकाने त्याच्यावर अमानुष अत्याचार केला. यात दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. नाशिक (Nashik) येथील नऊ वर्षीय मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनांच्या विरोधात आज भीम आर्मीच्या वतीने नंदुरबार शहरातील नेहरू चौकात आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक (Symbolic) मटके फोडून आणि निषेधाचे बॅनरबाजी करत या घटनेच्या निषेध करण्यात आला. राजस्थान आणि महाराष्ट्रातील नाशिक येथे झालेल्या घटनेच्या कुठल्याही पक्षाने दखल घेतली नाही. सर्वच पक्षांचा भीम आर्मीच्या वतीने निषेध (Protest March) करण्यात आला. देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांवर दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र सरकार या सर्व घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याने भीम आर्मी रस्त्यावर उतरून सरकारसमोर सर्व गोष्टी लक्षात आणून दिल्या.
लहान मुलांनी वेधले लक्ष्य
राजस्थान आणि नाशिक येथे झालेल्या घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. या आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांवर भारतीय कायद्यानुसार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नंदुरबार भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली. शहरात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येत लहान मुलं आणि महिला उपस्थित होत्या. लहान मुलांनी आंदोलकांचे लक्ष वेधून घेतले. हे चिमुकले हातात फलकं घेऊन आंदोलन करत होती.
अकोल्यात सम्राट अशोक ब्रिगेड सेनेची निदर्शने
राजस्थानमधील उच्चवर्णीय मुख्याध्यापकाच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या इंद्रकुमार मेघवाल दलित विद्यार्थ्याला न्याय मिळावा. दोषी जातीयवादी शिक्षकाला गंभीर शिक्षा व्हावी तसेच भारतात दलितांवरील वाढत असलेल्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय राबविण्यात यावी. यासाठी आज सम्राट अशोक ब्रिगेड सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलीत. दलितांवरील अत्याचाराची प्रकरणं कमी व्हावीत, अशी मागणी सम्राट अशोक ब्रिगेड सेनेनं केलीत. राजस्थानातील घटना असो की, नाशिकची घटना. दोन्ही घटनांत दलितांवर अत्याचार करण्यात आला आहे, असा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे. या घटनांतील दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.