विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके कमीच, ओसाड रान फुलवले नि गावात उत्साहाचे वातावरण

शाळा परिसर, गावठाण, खंडोबा आणि बिरोबा देवस्थानच्या सुमारे दहा एकर परिसरावर नंदनवन फुलवण्यात आले. घराच्या सभोवताली, शेताच्या बांधावर ४ हजार २६८ झाडांचे वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके कमीच, ओसाड रान फुलवले नि गावात उत्साहाचे वातावरण
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 7:26 PM

शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली : पूर्व भागातील कुलाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत गेली पाच वर्षांपासून वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि वृक्ष प्रेमींच्या सहकार्याने राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबविला आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण आणि भावी पिढीला पर्यावरणाचे महत्त्व असा दुहेरी हेतू साध्य केला आहे. शाळा परिसर, गावठाण, खंडोबा आणि बिरोबा देवस्थानच्या सुमारे दहा एकर परिसरावर नंदनवन फुलवण्यात आले. घराच्या सभोवताली, शेताच्या बांधावर ४ हजार २६८ झाडांचे वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्यात आले आहे.

दरवर्षी तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे वृक्षांचे आच्छादन वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही गावांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. असाच एक प्रयोग जत तालुक्यात राबवण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रयोग राबवण्यात येत असल्याने गावाच्या परिसराचा कायापालट झाला आहे. परिसर हिरवाईने नटला आहे.

कुलाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीने आणि श्रमदानातून सुमारे दोन हजार फूट पीव्हीसी आणि पाच हजार फूटहून अधिक भूमिगत ठिबक सिंचन पाईपलाईन केली आहे. परिसरातील पालापाचोळा गोळा करून त्याचे मल्चिंग केले आहे. झाडा सभोवती तारेचे कुंपण उभारले आहे.

हे सुद्धा वाचा

sangali 1 n एक लाख बियांचे संकलन

विद्यार्थ्यांनी एक लाखाहून अधिक बियांचे संकलन करून रोपवाटिका तयार केली आहे. पन्नास हजार सीड बॉल्स तयार केले आहेत. उजाड ओसाड माळरानावर वनराई हिरवाईने नटलेली आहे. परिसर निसर्गरम्य आणि समृद्ध बनला आहे. मधमाशा, पक्षी, चिमण्या, फुलपाखरे, वटवाघळांची संख्या वाढली आहे. उष्णतेच्या चटक्यांपासून पशुपक्षी, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

१२ एकर उजाड रान हिरवाईने नटले

सध्या उन्हाळी सुट्टी आहे. विद्यार्थ्यांना वृक्षांबद्दल आस्था आहे. त्यामुळे वृक्षसंगोपन चांगल्या पद्धतीने सुरु आहे. यापूर्वी राबविलेले उपक्रम शास्वत स्वरुपात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जत तालुक्यातील कुलाळवाडी येथील शाळेचा परिसर आणि खंडोबा बिरोबा देवस्थान परिसरातील झाडांचे देखभाल आणि संवर्धन विद्यार्थी करीत आहेत. तब्बल 12 एकर उजाड ओसाड माळरानावर वनराई हिरवाईने नटलेली आहे. परिसर निसर्गरम्य आणि समृद्ध बनला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.