फडणवीसांची भेट घेतली, रडत रडत शिवसेना सोडली, भाजपमध्ये प्रवेश करताना सुभाष साबणेंना उद्धव-बाळासाहेबांची आठवण!

भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे.

फडणवीसांची भेट घेतली, रडत रडत शिवसेना सोडली, भाजपमध्ये प्रवेश करताना सुभाष साबणेंना उद्धव-बाळासाहेबांची आठवण!
सुभाष साबणे
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 3:27 PM

नांदेड: भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. सुभाष साबणे यांना शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीनं हुंदका दाटून आला. शिवसेनेतील आठवणी सांगताना सुभाष साबणे यांना अश्रू अनावर झाले. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सुभाष साबणे नेमकं काय म्हणाले

मी 1984 पासन आज इतके वर्ष मी शिवसेनेमध्ये घालवली. आज अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मला शिवसेना सोडावी लागत आहे. शिवसेना सोडताना अतिशय वाईट वाटत आहे, असं साबणे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनीमला खूप प्रेम दिल जे मागितलं ते दिल उद्धव साहेबांनी पण खूप दिलं, अशी भावना सुभाष साबणे यांनी व्यक्त केली. यावेळी ते भावूक झाले होते.

आयुष्यात जय पराजय होत राहतो पण माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारण्याचा जो प्रकार झाला त्या मनाला वेदना देऊन गेल्या. राज्यात काँग्रेस संपली होती. उद्धव साहेबांमुळे तुम्ही सत्तेवर आलात आणि तुम्ही आम्हाला विसरता, असा सवाल साबणे यांनी अशोक चव्हाण यांना केला. आमच्या नेत्यांचे फोटो बॅनर वर देखील लावले जात नाहीत. आणि त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याने काळे झेंडे दाखवले तर त्यांना बुटासह मारण्याचा प्रयत्न झाला, असं साबणे म्हणाले. आमच्या सदस्यांना डीपीडीसी मधून निधी दिला जात नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

अशोक चव्हाण शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करतायत

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण करत आहेत. उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात मास्टर झालेली लोक आहेत. पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणस आहेत. शिवसेनेचे यामुळे मोठं नुकसान आहे.

माझ्या सारखी परिस्थिती अनेकांची आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांची इच्छा आहे की शिवसेनेने आता या महाविकास आघाडीतून बाहेर यावं. आमदार आणि खासदारांची हीच इच्छा आहे. मी जर सहन करून बसलो असतो तर आता काँग्रेस ला मतदान मागितलं असतं आणि मग 2024 ला कुणासाठी मतदान मागितलं असतं, असा सवाल सुभाष साबणे यांनी केला आहे. आज पंज्याला मतदान द्या अस म्हणायचं आणि मग 2024 ला कुणाल मतदान द्या म्हणून सांगायचं, असाही सवाल सुभाष साबणे यांनी केला.

इतर बातम्या:

VIDEO : Subhash Sabane | मी भाजपमध्ये प्रवेश करतोय, अशोक चव्हाणांची जिल्ह्यात एकाधिकारशाही- सुभाष साबणे

फडणवीसांनी नुकसानीची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला, देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला

Subhash Sabane emotional while left Shivsena remember Balasaheb Thackeray

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.