AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Damage to Sugarcane: टेम्भापुरी शिवारातील ऊसाला आग, 10 एकरातील ऊस जळून खाक

सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसतोड कधी होतेय याची भ्रांत असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मात्र, वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. ऊस तोडणीला आला असतानाच ऊसाला आगीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.

Damage to Sugarcane: टेम्भापुरी शिवारातील ऊसाला आग, 10 एकरातील ऊस जळून खाक
औरंगाबाद जिल्ह्यातील टेम्भापूरी शिवारातील 10 एकरातील ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 10:15 AM
Share

औरंगाबाद: सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (sugarcane cane) ऊसतोड कधी होतेय याची भ्रांत असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मात्र, वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. ऊस तोडणीला आला असतानाच ऊसाला आगीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. एकीकडे कडधान्यामधून मोठे नुकसान झाले आहे. ऊस हेच भरवश्याचे पीक असताना वाढत्या आगीच्या घटनांमुळे दुष्काळात तेरावाच अशीच काहीशी परस्थिती होत आहे. जिल्ह्यातील टेम्भापुरी गावच्या शिवारातील (Sugarcane fire) ऊसाला आग लागल्याने 10 एकरातील पीकाचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसले तरी (Farmer) शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न झाला मात्र, अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने नुकसान टळले नाही.

दुर्घटनेमुळे न भरुन निघणारे नुकसान

सध्या ऊसाचे पीक हे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाचरट वाळलेले असते शिवाय ऊसाचीही वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. असे असताना एका ठिणगीमुळेही घडलेली घटना टाळता येत नाही. ऊसाच्या पाचरटामुळे ही आग लागलीच रौद्ररुप धारण करते आणि अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते होते. असाच प्रकार टेम्भापुरी शिवारात झालेला आहे. वर्षभरात खरीप, रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे किमान ऊसामधून तरी उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद या भागातील शेतकऱ्यांना होता. मात्र, या दुर्घटनेनंतर आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत.

शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

10 ते 12 फूट ऊस डोळ्यादेखत जळत असल्यामुळे हातामध्ये मिळेल त्याने ऊस आटोक्यात आणण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. मात्र, ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नव्हते. परंतू, वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला ऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जळत होता.

दिगर शिवारातही आग मात्र, शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे नुकसान टळले

औरंगाबाद जिल्ह्यातील दिगर शिवारात देखील ऊसाला आग लागल्याची घटना घडली होती. मात्र, वेळीच परिसरातील शेतकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे. ऊसाच्या फडाला लागूनच असलेल्या रोहित्रातून ठिगण्या पडल्याने ही दुर्घटना घडली होती. मात्र, त्या दरम्यान अनेक शेतकरी होते त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या साहित्याने ही आग आटोक्यात आणली. मराठवाड्यात दोन दिवसांमध्ये ऊसाला आग लागण्याची घटनांमध्ये वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : 60 एकरातील ऊस जळून खाक, 20 शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

Video : काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर सोबत रेसिंग? गाडीत गाणी वाजवत जल्लोष,वर्धा अपघातापूर्वीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

उन्हाळी हंगाम : राज्यात विक्रमी कांदा लागवड, खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार का?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.