Kolhapur | कोल्हापूरच्या सिद्धार्थ शिंदेंची केंद्राने घेतली दखल, दिलेल्या सूचनांचा थेट अर्थसंकल्पात समावेश
कोल्हापुरातील सिद्धार्थ शिंदे यांनी केलेल्या सूचनांचा थेट अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या सूचनांची दखल घेतली आहे. अर्थसंकल्पामध्ये देशाला डिजिटलायझेनकडे नेण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जीवनस्तरात सुधारणा होण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व होते. अर्थसंकल्पात उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठीदेखील (Maharashtra) खास ठरला आहे. कारण कोल्हापुरातील सिद्धार्थ शिंदे यांनी केलेल्या सूचनांचा थेट अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिंदे यांच्या सूचनांची दखल घेतली आहे. अर्थसंकल्पामध्ये देशाला डिजिटलायझेनकडे नेण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जीवनस्तरात सुधारणा होण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तर विरोधकांनी हा अर्थसंकल्प पोकळ असून देशाला अधोगतीकडे नेणारा आहे, अशा शब्दात टीका केलीय.
सिद्धार्थ शिंदे या तरुणाने अर्थमंत्रालयाला केल्या सूचना
सिद्धार्थ शिंदे यांनी इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट आणि ग्रामीण भागातील ई-लर्निंग संदर्भात सूचना केल्या होत्या. देशात वाढता कचरा ही मोठी समस्या आहे. तसेच या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा सर्वांसमोरच उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. तसेच कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणपद्धती रुढ होत आहे. त्यामुळे ई- लर्निंगलाही तेवढेच महत्त्व आले आहे. मात्र ग्रामीण भागात ई- लर्निंगसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सिद्धार्थ शिंदे यांनी अर्थमंत्रालयाला काही सूचना केल्या होत्या. याच सूचनांचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
धोरणांची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी व्हावी
शिंदे यांच्या सूचनांचा आधार घेत कचरा तसेच ई-लर्निंगच्या बाबतीत बजेटमध्ये विशेष धोरण जाहीर करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाच्या उपशीर्षकात सिद्धार्थ शिंदे यांनी केलेल्या सूचनांचा उल्लेखही करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सूचनांची दखल घेतल्यामुळे सिद्धार्थ शिंदे यांनी आनंद झाला असल्याची भावना tv9 कडे व्यक्त केली. तसेच सूचनांचा समावेश अर्थसंकल्पामध्ये केलेला असला तरी आता धोरणांची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या :
Bhandara Video | दारुच्या दुकानावर चोरांचा डल्ला, दीड लाख रुपये लंपास; चोरी सीसीटीव्हीत कैद
Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…
PHOTO | ट्रकचा चेंदामेंदा, रस्त्यावर लाल चिखल! औरंगाबादमधील वैजापुरात विचित्र अपघात कसा घडला?