Sangli Murder : सांगलीत गळा दाबून महिलेचा खून, उसाच्या फडात आढळला मृतदेह

दररोजच्या प्रमाणे त्या सुमारे पाच साडेपाचच्या दरम्यान शेतात असलेल्या म्हसोबा मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. परंतु बराच वेळा झाला तरीही त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर बराच वेळ शोध घेतल्यानंतर घरापासून जवळपास 300 मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला.

Sangli Murder : सांगलीत गळा दाबून महिलेचा खून, उसाच्या फडात आढळला मृतदेह
सांगलीत गळा दाबून महिलेचा खूनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 7:41 PM

सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथील मंगसुळी रस्त्यावरील लकडे मळा येथे उसाच्या शेतात वृध्द महिलेचा मृतदेह (Deadbody) आढळला आहे. वासंती श्रीकांत देशींगे-लकडे (62) असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत वासंती देशींगे या नेहमीप्रमाणे पहाटे मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी या महिलेला आधी मारहाण (Beating) करण्यात आली. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या (Murder) करण्यात आली. मात्र ही हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

नेहमीप्रमाणे म्हसोबा मंदिरात दर्शनासाठी गेली होती मयत महिला

वासंती देशींगे या गेल्या 35 वर्षांपासून त्यांचा भाऊ विनायक व सुधाकर लकडे यांच्या घरी राहात होत्या. दररोजच्या प्रमाणे त्या सुमारे पाच साडेपाचच्या दरम्यान शेतात असलेल्या म्हसोबा मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. परंतु बराच वेळा झाला तरीही त्या घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर बराच वेळ शोध घेतल्यानंतर घरापासून जवळपास 300 मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे व सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या महिलेचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.