सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांच्या नावे सुसाईड नोट, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा शेतात गळफास

गोसाईटोला येथील ग्रामपंचायत कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांच्या नावे सुसाईड नोट, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा शेतात गळफास
suicide
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 9:41 PM

गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव तालुका पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गोसाईटोला येथील ग्रामपंचायत कर्मचारी संजय हिवकराज रंगारी (वय 45 वर्षं) यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रंगारी यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. (Suicide note in the name of Sarpanch, Gram Sevak, GramPanchayat employee commits suicide by hanging)

संजय रंगारी हे काल सायंकाळपासून बेपत्ता होते. आज सकाळी त्यांच्या शेताच्या बाजूला असणाऱ्या एका शेतकऱ्याने त्यांच्या कुटूंबाला माहिती दिली की मृतक हे स्वतःच्या शेतात किन्हीच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता मृतकाच्या जवळ एक चिठ्ठी आढळून आली.

मृतकाजवळ सापडलेल्या चिठ्ठीमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आणि पदावरून काढण्याच्या धमकीमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. फिर्यादी हिवकराज रंगारी यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

इतर बातम्या

इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

VIDEO : नाशिकमध्ये गुंडगिरी, भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद

वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका

(Suicide note in the name of Sarpanch, Gram Sevak, GramPanchayat employee commits suicide by hanging)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.