Sangli Crime : सांगलीतील विट्यात दोन चिमुरड्यांसह विवाहितेची आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले
विटा येथील शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा नं. 13 जवळ हात्तेकर कुटुंब भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी विवाहिता सोनाली हात्तेकर ही आपली चार वर्षाची मुलगी आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र सोनाली व दोन चिमुरडे कुठेही आढळून आले नाहीत.
सांगली : विटा येथील शाहूनगर येथील एका 26 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. सोनाली बिहुदेव हात्तेकर (Sonali Bihudev Hattekar) असे या आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. सोनालीने चार वर्षाची मुलगी व एक महिन्याच्या बाळासह विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने विटा शहरासह खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र सोनालीने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. (Suicide of a married woman with two chimurdas in Vita in Sangli)
शिवाजीनगर परिसरात विहिरीत आढळले मृतदेह
विटा येथील शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा नं. 13 जवळ हात्तेकर कुटुंब भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी विवाहिता सोनाली हात्तेकर ही आपली चार वर्षाची मुलगी आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र सोनाली व दोन चिमुरडे कुठेही आढळून आले नाहीत. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथे राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत एका महिलेने दोन चिमुरड्यासह आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी समजली. त्यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विवाहिता सोनाली हिच्यासह तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसून आले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या आणि क्रेनच्या मदतीने या तिघांचे मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढून विटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.
मुंबईत वयोवृद्ध इसमाकडून पत्नी आणि मुलीची हत्या
पत्नी आणि मुलीच्या आजारपणाला कंटाळून आणि त्यांची देखभाल करणे जमत नसल्याने मुंबईतील अंधेरी परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीने पत्नी आणि मनोरुग्ण मुलीचा गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषोत्तम सिंग गंडहोक(89) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून जसबीरकौर गंडहोक(81) आणि कमलजीतकौर गंडहोक(55) अशी हत्या करण्यात आलेल्या मायलेकींची नावे आहेत. मयत जसबीरकौर यांची अँजिओग्राफी झाली होती. तसेच त्यांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने गेल्या 10 वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. तर मुलगी कमलजीकौर ही मानसिक रुग्ण असून अविवाहित होती. अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत हे तिघे राहत होते. पत्नी आणि मुलीचे दुःख सहन होत नसल्याने आणि त्यांची देखभाल करणेही जमत नसल्याने पुरुषोत्तम यांनी गळा चिरुन त्यांना संपवले. यानंतर मोठ्या मुलीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीनुसार मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले तर आरोपीला अटक केली. (Suicide of a married woman with two chimurdas in Vita in Sangli)
इतर बातम्या
Video | ‘गाडी के पायदान’ आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या! लक्ष न देण्याऱ्यांचं काय होतं? बघा CCTV