Sujay Vikhe : काही लोकांना कमी काळात आपण राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला, सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला

सहावेळा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेऊन सहावेळा मुख्यमंत्र्यांबरोबर काम करणारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील होय. तर मागील अडीच वर्षात दिसले नाहीत, असे चेहरे आता समोर येत आहेत, अशी टीका सुजय विखे यांनी केली.

Sujay Vikhe : काही लोकांना कमी काळात आपण राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला, सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला
निलेश लंके/सुजय विखेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 12:28 PM

अहमदनगर : काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला, त्याला आपण काही करू शकत नाही, अशी टीका नाव न घेता सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर केली आहे. भाजपा आयोजित एका कार्यक्रमात सुजय विखे यांनी हा घणाघात केला आहे. ते म्हणाले, की कुणाला वाटत असेल सुजय विखे कुणाला घाबरतो, सुजय विखेला दडपण आले आहे. मात्र असे अजिबात नाही, असा टोला त्यांनी लगावला. एक महिन्यात पारनेर तालुक्यातून एकही अनधिकृत वाळूचे डंपर जाणार नाही, असा इशारा देखील सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिला आहे. तसेच तहसीदारांमार्फत धाडी टाकून गरीबांकडून पैसे वसूल करणे पारनेर (Parner) तालुक्यात आजपासून बंद होणार, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

‘एकही अनधिकृत वाळूचे डंपर पारनेर या ठिकाणाहून जाणार नाही’

जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उपसासंदर्भात त्यांनी आक्रमक होत हे प्रकार बंद होणार असल्याचे म्हटले आहे. राधाकृष्ण विखे जोपर्यंत महसूल मंत्री आहेत, तोवर एक महिन्यामध्ये एकही अनधिकृत वाळूचे डंपर पारनेर या ठिकाणाहून जाणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला आहे. आम्हाला नको आहेत असे कार्यकर्ते जे वाळू उपसा करतात, आम्हाला नकोत ते गुंड ज्यांच्यापासून समाजाला धोका आहे, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले सुजय विखे?

‘सत्तांतरानंतर पहिल्या दोन तासात जो हार आणतो तो आपला कधीच नसतो’

परिस्थिती बदलत असते. लोक मंत्री होतात-जातात. मात्र काही जणांना कमी काळामध्ये आपण मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला, त्याला आपण काहीही करू शकत नाही. सहावेळा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेऊन सहावेळा मुख्यमंत्र्यांबरोबर काम करणारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील होय. तर मागील अडीच वर्षात दिसले नाहीत, असे चेहरे आता समोर येत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. सत्तांतरानंतर पहिल्या दोन तासात जो हार आणतो, सत्कार करायला येतो, तो आपला कधीच नसतो, या विचाराने जगणार मी आहे, असे म्हणत पक्षबदलू कार्यकर्त्यांचा त्यांनी समाचार घेतला. दरम्यान, आपल्या पक्षात आणखी लोक येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.