मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच 2 BHKचा फ्लॅट घ्यावा; सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

शंभुराज यांचे मला कौतुक आहे. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता?

मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच 2 BHKचा फ्लॅट घ्यावा; सुषमा अंधारे यांची जोरदार टीका
sushma andhareImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 8:16 AM

सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई आणि पुण्यातील दौरे वाढले आहेत. त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही मोदी-शाह यांच्या या दौऱ्यांवर टीका केली आहे. मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घेऊन राहावे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी देसाई यांच्यावरही चौफेर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळेच कंठघोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच 2 BHKचा फ्लॅट घ्यावा, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

रक्त आटवू नका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला हव्या होत्या, अशी अपेक्षा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली होती. त्यावरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे रोखठोक आहेत.

14 तारखेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात संधी मिळावी यासाठी संजय शिरसाठ असं विधान करत आहेत. आमच्या पोटात जे असते तेच ओठावर असते. संजू भाऊंनी उगाच रक्त आटवू नये, असा टोला त्यांनी लगावला.

पाटण मतदारसंघ मिळवणार

यावेळी त्यांनी पालकमंत्री शुंभराज देसाई यांच्यावरही टीका केली. शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळात शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा कार्यर्त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही काळीमा फासला

शंभुराज यांचे मला कौतुक आहे. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही.

तुम्ही आजोबांच्या नावाला काळीमा फासला. मी जे काही बोलत आहे, ते रेकॉर्ड करून खबऱ्यांनी देसाई यांना पाठवावे, असं सांगतानाच शंभुराज तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? चाळीसजण रोज बडबडत आहेत. याचाच अर्थ महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली आहे, असंही त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांना डिवचले

यावेळी त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना डिवचले. संजय राठोड यांच्या पाठी ठामपणे उभे राहणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शिंदे-फडणवीस राठोड यांच्या पाठी राहणार असतील तर चित्रा वाघ काय करणार? असा सवाल त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.