… आणि एकनाथ शिंदे यांचा गेम होईल; सुषमा अंधारे यांचा दावा काय?
मोदी हिंदुत्ववादी नाहीत असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. त्यांचं विधान गांभीर्यपूर्वक आणि विचार करण्यासारखं आहे. कारण स्वामी हे भाजपचे जुनेजाणते नेते आहेत.
पंढरपूर: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. अंधारे यांच्या जुन्या व्हिडिओवरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या व्हिडिओचा निषेध म्हणूनच वारकऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली असून त्यावर अंधारे यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नसून मोहन भागवत संप्रदायाचे आहेत, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा भाजपकडून कधी गेम होईल हे त्यांना कळणारही नाही, असा दावाही त्यांनी केला.
सुषमा अंधारे पत्रकार परिषद हा हल्लाबोल केला आहे. मोदीजींना देखील आव्हान देऊन पंतप्रधान पदावर दावा देणारे नाव देवेंद्र फडणवीस असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे 40 आमदार भाजप कधी आपल्या पक्षात घेईल हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा कळणार नाही आणि एकनाथ शिंदे यांचा गेम होईल, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला.
माझी क्लिप म्हणजे भाजपचे षडयंत्र आहे. खरा वारकरी वाद घालणार नाही. असं अमंगल काही करणार नाही. आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत. पंधरा वर्षानंतर ती क्लिप व्हायरल करून आता काही प्रश्न विचारले जातात. कारण त्यांना आता काही प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर त्यांना देता येत नाहीत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
मला विरोध करणारे ते कीर्तनकार नव्हेत, प्रहसनकार आहेत. पेड कीर्तनकार आहेत. मोहन भागवत संप्रदायाचे कीर्तनकार आहेत. माझ्या क्लिपबद्दल चर्चा होते, मात्र सावरकरांनी तेच लिहून ठेवले आहे. श्री श्री रविशंकर यांनी देखील हेच लिहून ठेवले आहे. त्यांना याबद्दल काही प्रश्न विचारले जात नाही. केवळ मी शिवसेनेत असल्यामुळे माझ्या क्लिपा दाखवून प्रश्न विचारले जातात, असा हल्लाही त्यांनी चढवला.
राज्यपाल हटाव व इतर गोष्टींना झाकण्यासाठीचे प्रयत्न टीम देवेंद्रजींकडून सुरू आहेत. त्याचा भाग म्हणून माझ्या क्लिपचा वापर होतो आहे. देवेंद्रजींच्या भाषेत मी चार महिन्याचे बाळ असेल आणि चार महिन्यातच त्यांना सळो की पळो करत असेल तर ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल, असंही त्या म्हणाल्या.
मोदी हिंदुत्ववादी नाहीत असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. त्यांचं विधान गांभीर्यपूर्वक आणि विचार करण्यासारखं आहे. कारण स्वामी हे भाजपचे जुनेजाणते नेते आहेत. मोदींच्या अगोदरही भाजपा घडवण्यामध्ये ज्यांनी हयात घालवली त्यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव आहे. मोदी यांच्या सत्ता केंद्र विचाराने अडवाणी, स्वामी मागे पडले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
शहाजीबापू हा रांगडा भाऊ आहे. जरा समजून सांगू या… शिवसेना होती म्हणून 800 मतांनी निवडून आला. चुकलंय … आमच्या बहीण भावांच्या नात्यात जरा समजून सांगू या, असा टोला त्यांनी लगावला.