Buldana Kidnapping : चॉकलेट देऊन मुलांच्या अपहरणाचा संशय, किन्नराला मारहाण, नेमकं काय घडलं?

लहान मुलांना चॉकलेट देऊन अपहरण करण्याचा संशय असलेल्या किन्नराला जमावाकडून मारहाण करण्यात आली. जमावाने किन्नरांना पोलिसांच्या हवाली केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

Buldana Kidnapping : चॉकलेट देऊन मुलांच्या अपहरणाचा संशय, किन्नराला मारहाण, नेमकं काय घडलं?
शाळेत खळबळ
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 10:16 PM

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे लहान मुलांना चॉकलेट (chocolates) देण्यात येत होते. त्यामुळं या मुलांचं अपहरण करण्याचा संशय असलेल्या एका किन्नरला जमावाकडून जबर मारहाण करण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. जमावाने या किन्नराला पोलिसांच्या (Police) सुद्धा हवाली केले. जळगाव जामोद (Jalgaon Jamod) परिसरात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा सध्या होत आहे. त्यातूनच आज हा प्रकार घडला. किन्नराला चांगलाच मार खावा लागला.

सायराला बेदम मारहाण

जळगाव जामोदच्या जामोदमध्ये आज बाजार भरत असतो. सायरासह त्याची साथीदार हे दोघे त्याठिकाणी पैसे मागायला गेले होते. मात्र एका लहान मुलाला चॉकलेट देण्यात आले. मुलांना पळवण्याचा संशय सायरा नावाच्या किन्नरावर नागरिकांना आला. त्याठिकाणी जमावाने सायराला बेदम मारले. सायराला पोलिसांच्या हवालीसुद्धा केले.

मारहाण करणारे तिघे ताब्यात

याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. किन्नरांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. नाहीतर आम्ही आंदोलन करू, असा इशार किन्नरांनी पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. आणखी काही लोकांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. अशी माहिती मोगराबाई या किन्नरानं दिली.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ व्हायरल

एका किन्नराला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ आहे. लाताबुक्यांनी मारहाण करण्यात येत आहे. जमाव एकत्र आला. त्यांना संशय आल्यानं त्यांनी मारहाण केली. पण, शहानिशा न केल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत. यामुळं मारहाण करणारे आता अडचणीत आले आहेत. तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इतरही मारहाण करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत.

मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी

किन्नर समाजातील लोकांनी हा विषय लावून धरला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी आता त्यांनी केली आहे. त्यामुळं मारहाण करणारे इतरत्र पसार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.
कराडवर मकोका लावण्यासाठी अल्टिमेटम, मस्साजोगमध्ये नेमकं काय-काय घडलं?
कराडवर मकोका लावण्यासाठी अल्टिमेटम, मस्साजोगमध्ये नेमकं काय-काय घडलं?.
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....