उद्योगांसाठी पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्याशी बोलणं सुरू, मुख्यमंत्री म्हणतात, आरोपाला कामानं उत्तर देऊ
प्रत्येक विभागात कमी वेळात जास्त काम करण्याचा प्रयत्न करतोय.
नंदुरबार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. काही लोकं बांधावर जातात, त्यांना मी कामाला लावलं आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्यावरून त्यांनी ही टोला लगावला. काही लोकं बांधावर जाता, सर्वांना मी कामाला लावलं, असा टोला त्यांनी लगावला.
काही लोकं म्हणाले, आपण काम करत राहिलो, तर आरोप करणाऱ्यांना आरोप करू द्या. काही लोकं बांधावर जातात. चांगलं आहे. ठीक आहे. गेले पाहिजे. सर्वांना मी कामाला लावलं आहे. शेवटी काम तर करायलाचं पाहिजे. सरकारमध्ये असणाऱ्यांनी आणि बाकीच्यांनी पण. शेवटी लोकांना मदत झाली पाहिजे. हे सरकार लोकांचं आहे.
प्रत्येक विभागात कमी वेळात जास्त काम करण्याचा प्रयत्न करतोय. गुलाबराव पाटील यांनी 22 हजार पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. 60 कोटी 28 लाख रुपये मंजूर झालेत. तीन मिनिटांत जीआर निघाला, शासन, प्रशासन गतिमान आहे.
नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं निर्णय घेऊन पैसे वर्ग केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. 132 केव्हीसाठी जागा पाहिजे. एमआयडीसीचे उद्योग मंत्री सामंत यांना सांगतो. तुमच्या विषय मार्गा लावतो, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यासाठी आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम करायचं आहे. चंदू भैय्या धडाडीचा माणूस आहे. आले की, निधी घेऊन आल्याशिवाय राहत नाही. कार्यकर्त्याला तळमळ असते. तातडीनं रस्ते, दिवाबत्ती, यासाठी पैसे कमी पडून दिले जाणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय.