उद्धव ठाकरे यांचे सरकार कोण चालवत होतं, तानाजी सावंत यांनी यादीच वाचली

फोन चालवणारा शिवसेना चालवत असतील ते आम्हाला मान्य नाही. सर्व सामान्य शिवसैनिकांमध्ये सुखद क्षण कसे येतील, यासाठी सत्तांतर झालाय.

उद्धव ठाकरे यांचे सरकार कोण चालवत होतं, तानाजी सावंत यांनी यादीच वाचली
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 7:16 PM

परभणी : जर सरकार बदलल नसतं तर आज आपण हा मेळावा घेऊ शकलो नसतो. कारण महाराष्ट्र शासनाने आपल्याला कोरोना म्हणून घरी बसवलं असतं. ज्या ज्या वेळी अधिवेशन येत होतं, त्यावेळी मीडियाला सांगत होते कोरोना आला कोरोना आला. पळा पळा… मी जसा आरोग्य मंत्री झालो तसं मी सांगितलं. कोरोनाला घाबरू नका. एकालाही घरी बसावं लागलं नाही, असा टोला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लगावला. सावंत म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीतून आपल्याला भगवा कोणाचा धनुष्यबाण कोणाचा, हे सर्वांना दाखवून द्यावे लागेल. आपण शिवसैनिकांचे कधीच प्रस्थापितांसोबत जमले नाही.

हा बाबा (उद्धव ठाकरे) सरळ उठला आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. एका पदासाठी आपला तत्कालीन पक्षप्रमुख जर शरद पवारांच्या आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसत असेल तर आम्हाला हे मान्य नाही, असंही तानाजी सावंत यांनी सुनावलं.

हे सुद्धा वाचा

मुठभर लोकांनी महाराष्ट्रात शिवसेना जिवंत ठेवली होती. तुमचे पीए, ड्रायव्हर, फोन चालवणारा शिवसेना चालवत असतील ते आम्हाला मान्य नाही. सर्व सामान्य शिवसैनिकांमध्ये सुखद क्षण कसे येतील, यासाठी सत्तांतर झालाय. महाविकास आघाडीला इशारा देतो की, आमच्या नादाला लागायचं नाही. शिवसैनिक सहन करायचं तेवढं सहन करतो. 2024 मध्ये तुम्हाला माती दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.

अजून प्रशासनाच्या डोक्यातून जर काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता गेली नसेल, तर माझा रस्त्यावरचा शिवसैनिक तुमच्या डोक्यातील प्रशासन पायावर आणल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो. जर तुम्हाला आमची सत्ता आलेली पचत नसेल तर आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना सांगतो. महाराष्ट्राच्या बाहेर बदली करून जा.

कारण आयपीएस, आयएएस यांना त्यांची औकात दाखवण्याचा दम माझ्या शिवसैनिकाच्या मनगटामध्ये आहे. शिवसैनिकांनी फेकलेला दगड तुमच्या कुठे लागेल हे मला माहीत नाही. शिवसैनिकांचे आणि लोकप्रतिनिधींचे कामे ही जनतेची असतात. त्यामुळे त्यांची सगळी कामे आदरानं सोडवली पाहिजे, असंही तानाजी सावंत यांनी म्हंटलं.

माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र माजी मुख्यमंत्री ठाकरे आजही जागे झालेले नाहीत. म्हणून 40 अधिक 10 अशा 50 आमदारांनी 13 खासदारांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. बाळासाहेबांची शिकवण त्यांनी दाखवलेली दिशा ते साकार करण्यासाठी माझ्या नेत्यांनी हा निर्णय घेतला. माझ्या नेत्यांनी घेतलेला निर्णय राज्यासाठी आणि हिंदुत्वासाठी योग्य होता, हे सांगण्यासाठी आज मी इथं आलोय, असंही सावंत यांनी सांगितलं.

2019 मध्ये अचानक पहाटे पाऊस पडावा, असा निर्णय तात्कालीन पक्षप्रमुखांनी घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्यांना शिव्या घालण्यामध्ये बाळासाहेबांनी आयुष्य घातला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय घेतला. 1980 सालापासूनचा मी शिवसैनिक आहे. आमचा जन्मच शिवसेनेचा आहे, असंही यावेळी सावंत यांनी ठाकरे यांना सुनावलं.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.