शिक्षकांकडूनचं शिक्षक दिनाचं कणकवलीकरांना गिफ्ट, 44 लाखांच्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी, वैभव नाईक यांच्याकडून कौतुक
सिंधुदुर्गात शिक्षक दिनी शिक्षकांनी सरकारी रुग्णालयाला अनोखी भेट दिली आहे. शिक्षकांनी स्वखर्चातून ऑक्सिजन प्लांट आणि अद्ययावत कोरोना वॉर्ड उभारला आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात शिक्षक दिनी शिक्षकांनी सरकारी रुग्णालयाला अनोखी भेट दिली आहे. शिक्षकांनी स्वखर्चातून ऑक्सिजन प्लांट आणि अद्ययावत कोरोना वॉर्ड उभारला आहे.आज शिक्षक दिनीच या प्लांटचे व कोरोना वार्डचे लोकार्पण करण्यात आले. 44 लाखांचा ऑक्सिजन प्लांट आणि 35 बेडचं कोविड सेंटर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलं. यावेळी आमदार वैभव नाईक उपस्थित होते. वैभव नाईक यांनी शिक्षकांनी समाजाप्रती जपलेल्या बांधिलकीबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गातील शिक्षकांनी स्वनिधीतून तब्बल 44 लाखांचा अद्ययावत असा ऑक्सिजन प्लांट आणि 35 बेडचे कोव्हिड सेंटर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उभारले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक , संघटनेचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे , सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नितीन कदम , कणकवली तहसीलदार आर जे पवार आदी मान्यवर उपस्थित होते . उदघाटनानंतर शासकिय रुग्णालयाला हा ऑक्सिजन प्लांट आणि कोरोना वॉर्डचे लोकार्पण करण्यात आले आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय स्वंयपूर्ण होणार
पीएसए पद्धतीच्या या ऑक्सिजन प्लांट मधून 333 लिटर प्रति मिनिट इतक्या ऑक्सिजनचा पुरवठा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला केला जाणार आहे. याबरोबरच 35 बेडस सह सुसज्ज कोव्हिडं कक्ष देखील याठिकाणी तयार करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांट मुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालय ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण होणार आहे . याचा फायदा कोरोना सह इतर सर्व रुग्णांना सुद्धा होणार आहे.
शिक्षकांचं कौतुक
आमदार वैभव नाईक यांनी शिक्षकांच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले आहे. पीएसए पद्धतीच्या ऑक्सिजन प्लांटमधून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. यामुळे ऑक्सिजन प्लांट मुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालय ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण होणार असल्याचं वैभव नाईक म्हणाले.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शिक्षण मंत्र्यांकडून सन्मान
देशाचे भवितव्य घडवणारे शिक्षकच समाजाचे खरा आधार स्तंभ आहेत असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करताना काढले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जे उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केले याचा फायदा भविष्यात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. खुर्शीद कुतबुद्दीन शेख व खोसे उमेश रघुनाथ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी यांच्या शासकीय निवासस्थानी केला.
इतर बातम्या:
मराठवाड्यात दमदार पाऊस, हिंगोलीत पुरामुळं दोघांचा मृत्यू, नांदेडमध्ये एकाचा मृत्यू, पिकांनाही फटका
Chipi Airport: चाकरमान्यांसाठी गोड बातमी! येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं टेकऑफ!
Teachers Day 2021 Sindhudurg teachers build forty four lakh rupees oxygen plant in Kankawali