मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर टेम्पोने पेट घेतला, एकाचा मृत्यू

मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर एका आयशर टेम्पो अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला. एक्सप्रेस-वेवरील रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत मुबंईहुन पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो काही कारणांमुळे बदं पडला होता. त्या टेम्पोला पेट्रोलिगं टिमने एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले.

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर टेम्पोने पेट घेतला, एकाचा मृत्यू
tempo got fire
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 7:27 AM

रायगड : मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर एका आयशर टेम्पो अचानक पेट घेतला. या घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला. एक्सप्रेस-वेवरील रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत मुबंईहुन पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो काही कारणांमुळे बदं पडला होता. त्या टेम्पोला पेट्रोलिगं टिमने एका बाजुला करुन बँरिगेट्स लावले. त्यानतंर काही वेळाने या टेम्पोने अचानक पेट घेतला. त्या आगीमध्ये टेम्पोच्या केबीन मधील एक व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेहाला टेम्पोतून काढून खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

मध्यरात्रीच्या दरम्यान लागलेल्या या आगीमध्ये आयशर टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला आहे. खोपोली अग्नीशमन दल, सिडको अग्निशमन दल, रिलायन्स अग्नीशमन दलाने आगीवर नियत्रंण मिळवले. पण, या दरम्यान मुबंईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखुन धरण्यात आल्याने दोन किमीपर्यंत वाहनाच्यां रांगा लागल्या होत्या.

देवदुत टिम, आय आर बी यत्रंणा, डेल्टा फोर्स, वाहतुक पोलीस पळस्पे, रसायनी पोलीस स्टेशन, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक यत्रंणा चे टिम सदस्याने दोन तासाच्या प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळवुन पुन्हा वाहतुक सुरळीत केली.

गंगापूर रोडवर ट्रकला भीषण आग

तर काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की, संपूर्ण परिसरात आग आणि धुराचे लोळ उठत होते. ट्रक चालक रस्त्यावरून जात असताना काहीतरी बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने रस्त्याच्या खाली ट्रक घेण्याचा प्रयत्न केला. ट्रक रस्त्याच्या खाली कोसळला.

सुदैवाने चालक बचावला

ट्रक रस्त्याच्या खाली कोसळल्यानंतर त्याला भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचे मोठे लोळ ट्रकमधून बाहेर पडू लागले. गंगापूर रोडवरील विराज हॉटेल जवळ ही घटना घडली. या आगीमुळे काही काळ रस्त्यावर काळ्या धुराचे साम्राज्य पसरले होते. सुदैवाने ट्रकमधील बिघाड वेळीच लक्षात आल्याने चालकाचे प्राण वाचले.

संबंधित बातम्या :

राज्यात चार आगीच्या घटना, कुठे ट्रक पेटला, तर कुठे दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.