Gadchiroli Tiger : गडचिरोलीत नरभक्षक वाघाची दहशत, दोन दिवसांत दोन नागरिकांचा बळी

| Updated on: Sep 10, 2022 | 3:04 PM

तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केलंय.

Gadchiroli Tiger : गडचिरोलीत नरभक्षक वाघाची दहशत, दोन दिवसांत दोन नागरिकांचा बळी
Follow us on

गडचिरोली नरभक्षक वाघाने दोन दिवसात दोन नागरिकांचा बळी घेतलेला आहे. परवाच्या दिवशी उसेगाव परिसरात एका शेतकऱ्यांचा बळी घेतला. काल रात्रीच्या वेळी गुराच्या रक्षणासाठी जंगलात झोपलेल्या इसमावर हल्ला करून ठार केलं. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी उसेगाव येथे गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक बोलावली.

गावकरी व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व सीसीएफ कार्यालयाला भेट देतील. तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हा नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केलंय.

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील कळमटोला येथे ६५ वर्षीय व्यक्ती सरपण गोळा करण्यासाठी गेला होता. या व्यक्तीवर नरभक्षक वाघाने हल्ला करून ठार केली. ही घटना ९ सप्टेंबरला शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. कृष्णा ढोणे असं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

हे सुद्धा वाचा

घटनेनंतर पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह गडचिरोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. गडचिरोली, आरमोरी आणि वडसा तालुक्यात नरभक्षी वाघाच्या हल्ल्यातीन बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गडचिरोली नरभक्षक वाघाने गुरुवारी एका शेतकऱ्यांचा बळी घेतला. सिटी वनच्या नरभक्षक वाघाने हल्ला केला. शेतीच्या कामासाठी जंगलात गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर नरभक्षक वाघाने हल्ला केला. एका शेतकऱ्याने पळ काढल्याने त्याचे जीव वाचला. परंतु एक शेतकरी जागीच ठार झाला. ठार झालेल्या शेतकर्‍यांचे नाव प्रेमपाल तुकाराम प्रधान आहे.

देसाईगंज तालुक्यातील उसेगाव परिसरात ही घटना आहे. या नरभक्षक वाघाला ताबडतोब जेरबंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. परंतु, वनविभाग याकडं विशेष लक्ष देत नसल्याचं दिसतं.