“उद्धव ठाकरे यांच्यावर भुंकण्यासाठीच ‘या’ पाळीव प्राण्याला भाजपने का पाळावं?”; ठाकरे गटाच्या नेत्याची नितेश राणे यांच्यावर पातळी सोडून टीका

नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ती माहिती दाखव, कशाला ढुंगणाखाली घालून ठेवतोस. हिंमत नसेल तर राजकारणातून चालता हो अशा शब्दात त्यांन त्यांचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर भुंकण्यासाठीच 'या' पाळीव प्राण्याला भाजपने का पाळावं?; ठाकरे गटाच्या नेत्याची नितेश राणे यांच्यावर पातळी सोडून टीका
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 8:32 PM

सिंधुदुर्ग : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहे. तर दुसरीकडे आता शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आलेले असतानाच ठाकरे गटाने भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी महाविकास आघाडीचे आगामी काळातील राजकीय भूमिका काय असणार याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवाव्यात असे तिन्ही पक्षांचे एकमत झालं आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.

यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या पक्षाच्या जेवढ्या जेवढ्या जागा आहेत, त्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहणार आहेत. शिल्लक राहिलेल्या जागांवर दोन नंबरला कोण होता, कोणाचा प्रभाव आहे याचा विचार करून वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेला 18 जागा मिळायलाच हव्यात व शिल्लक राहिलेल्या जागांबाबत ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट करतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

विनायक राऊत यांनी यावेळी राणे दांपत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपमध्ये मोठे दिग्गज नेते असताना कणकवलीमधून निवडून गेलेल्या आणि उकिरडा हुंगणाऱ्या या पाळीव प्राण्याला केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंवर भुंकण्यासाठी भाजपने का पाळाव?

नैतिक अधःपतन ज्या माणसाकडून केलं जातं, ज्या भाषेतून नको ते शब्द उच्चारले जातात हे भाजपला शोभा देणारे आहे का? भाजपच्या विचारवंतांना नितेश राणेची भाषा चालणार आहे का? चालणार असेल तर भाजपचे हे अधःपतन आहे. आणि चालणार नसेल तर ढुंगणावर लाथ मारून एक ना एक दिवस हाकलून लावणार असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

नितेश राणे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही गुन्हेगारीतून निर्माण झालेली आहे. त्यांचा जन्मच गुन्हेगारी प्रवृत्तीतून झालेला आहे. तर वडिलांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात किती खून झाले होते हे जगजाहीर आहे.

नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी रझा अकादमी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

त्या नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ती माहिती दाखव, कशाला ढुंगणाखाली घालून ठेवतोस. हिंमत नसेल तर राजकारणातून चालता हो अशा शब्दात त्यांन त्यांचा समाचार घेतला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.