चंद्रपूरमधील वाढत्या जादूटोणा तंत्र-मंत्र घटना रोखण्यासाठी प्रशासन सरसावले; अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सादर केला आराखडा
जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक तालुक्यातील 10 समस्याग्रस्त गावांमध्ये जादूटोणा विरोधी कृती दल स्थापन करावे अशी सूचना आराखड्यात करण्यात आली आहे. गावातील सरपंच- पोलीस पाटील- महिला मंडळ सदस्य, युवक मंडळ सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष यांचा या कृती दलात समावेश असेल.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गेले दोन महिने जादूटोणा तंत्र- मंत्र यातून मारहाण व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची पाच प्रकरणे पुढे आली. या प्रकरणात स्थानिक स्तरावर पोलिस ठाणे व अनिस कार्यकर्त्यांनी प्रबोधन करत काही ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आगामी काळात या घटना रोखण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अंनिसने एक कृती आराखडा दिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते प्रा. हरिभाऊ पाथोडे यांनी हा सर्वंकष आराखडा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. (The administration stepped in to curb the rising sorcery in Chandrapur)
काय आहे आराखड्यात?
जिवती तालुक्यातील वणी खुर्द ते चिमूर तालुक्यापर्यंत विविध तंत्र मंत्र -भानामती- जादूटोणा विषयक घटनांनी जिल्हा ढवळून निघाला आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक तालुक्यातील 10 समस्याग्रस्त गावांमध्ये जादूटोणा विरोधी कृती दल स्थापन करावे अशी सूचना आराखड्यात करण्यात आली आहे. गावातील सरपंच- पोलीस पाटील- महिला मंडळ सदस्य, युवक मंडळ सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष यांचा या कृती दलात समावेश असेल. या कृती दल सदस्यांना अंनिस कार्यकर्ते प्रशिक्षण देतील. याशिवाय प्रबोधन सभा तज्ज्ञ मार्गदर्शकांची प्रात्यक्षिके आदींचे आयोजन देखील केले जावे असे आराखड्यात सुचवण्यात आले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासंदर्भातील लेखी साहित्य तयार करणे, चित्र प्रदर्शनी भित्तीपत्रके या माध्यमातून जनजागृती व्हावी असे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. अंधश्रद्धांचा पगडा कमी करण्यासाठी व वैज्ञानिक जाणिवा विकसित करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना प्रशिक्षण देण्याची गरज आराखड्यात अधोरेखित करण्यात आली आहे. आराखड्यात जादूटोणा विरोधी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्याचे देखील सुचविण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी जादूटोणाच्या संशयातून झाली होती शिवीगाळ-मारहाण
जादूटोणा केल्याचा आरोप करत एका 49 वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी चंद्रपुरात उघडकीस आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील मोहाडी गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 49 वर्षीय पीडित व्यक्ती सायंकाळच्या दरम्यान आपल्या घरी असताना याच गावातील विकास गजभे (19) या तरुणाने पीडिताच्या घरी येत तू माझ्या मोठ्या भावावर जादू केली आहेस, असं म्हणत शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी विकास गजभे याला अटक केली होती. (The administration stepped in to curb the rising sorcery in Chandrapur)
पुणे तिथे काय उणे…! ज्वेलर्सवर उद्घाटनाच्या दिवशीच चोरट्यांचा डल्लाhttps://t.co/bUMkCgJIjn#Pune |#JewelleryShop |#Theft |#OpeningDay |#Arrest
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2021
इतर बातम्या
अवघ्या 23 हजारात घरी न्या शानदार स्कूटर, 57 kmpl मायलेजसह एका वर्षाची वॉरंटी
Video | “अल्लाहसाठी स्त्री-पुरूष समान, मला शाळेत जायचंय” अफगाणिस्तानमधील मुलीचा व्हिडीओ व्हायरल