Vasai Crime : वसईत कारमध्ये जळालेला मृतदेह, नागरिकांमध्ये घबराट; वाचा नेमकं काय घडलं ?

| Updated on: May 26, 2022 | 7:00 PM

वसईच्या मधुबन परिसरात मोठमोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहेत. रस्ते मोठे आहेत पण अजून तितकी वस्ती झालेली नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक वेब सिरीज, मालिका, चित्रपटाचे सलग कोणते ना कोणते चित्रीकरण सुरू असते. अशाच एका चित्रीकरणात जळालेली कार आणि त्यात जळालेल्या माणसाचा पुतळा ठेवून चित्रीकरण करण्यात आले होते.

Vasai Crime : वसईत कारमध्ये जळालेला मृतदेह, नागरिकांमध्ये घबराट; वाचा नेमकं काय घडलं ?
वसईत कारमध्ये जळालेला मृतदेह, नागरिकांमध्ये घबराट
Image Credit source: TV9
Follow us on

वसई : वसईच्या मधुबन परिसरात एका जळालेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. वालीव पोलिसांना या कारबाबत माहिती देण्यात आली. मृतदेहाची माहिती मिळताच वालीव पोलिस (Waliv Police) तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली असता जळालेली कार (Burnt Car) आणि त्यातील व्यक्तीचा मृतदेह हा चित्रीकरणामधील असल्याचे स्पष्ट झाला अन् पोलिसांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

शुटिंगमध्ये वापरण्यात आली होती कार

वसईच्या मधुबन परिसरात मोठमोठ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहेत. रस्ते मोठे आहेत पण अजून तितकी वस्ती झालेली नाही. त्यामुळे या परिसरातील अनेक वेब सिरीज, मालिका, चित्रपटाचे सलग कोणते ना कोणते चित्रीकरण सुरू असते. अशाच एका चित्रीकरणात जळालेली कार आणि त्यात जळालेल्या माणसाचा पुतळा ठेवून चित्रीकरण करण्यात आले होते. पण चित्रीकरणानंतर कार बाजूला हटवण्याऐवजी ती भर रस्त्यावर ठेवून संबंधित व्यक्ती निघून गेले होते.

फिरायला गेलेल्या नागरिकांनी कार आणि मृतदेह पाहिला

बुधवारी 25 मे रोजी सायंकाळी नागरिक फिरायला गेले असताना एका बेवारस जळालेल्या गाडीत जळून खाक झालेला एक मृतसदृश इसम पाहून सर्वानाच धडकी भरली होती. आजूबाजूला कुणीही नसल्याने काय प्रकार झाला याबाबत सर्व अनभिज्ञ होते. माञ तोपर्यंत या बाबतची अफवा सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. पोलीस घटनास्थळी आल्यावर चिञीकरणासाठीच्या आणलेल्या या गाडी हा जळालेला पुतळा ठेवल्याच स्पष्ट झालं आणि येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (The body of a man was found in a burnt car in Madhuban area of Vasai)

हे सुद्धा वाचा