“राजकारणात तांबे-थोरात कुटुंबीय एकच;” विजयामागचे कारणही सत्यजित तांबे यांनी सांगितलं

| Updated on: Feb 03, 2023 | 5:20 PM

राजकारणामध्ये थोरात-तांबे कुटुंबीय एकच आहेत. आम्ही आमच्या शत्रूलाही शत्रू मानत नाही, असंही सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलं.

राजकारणात तांबे-थोरात कुटुंबीय एकच; विजयामागचे कारणही सत्यजित तांबे यांनी सांगितलं
सत्यजित तांबे
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसमय झालेला जिल्हा होता. या जिल्ह्यात काँग्रेसने अधिराज्य गाजविले. कम्युनिस्टांच्या या बालेकिल्यात नवं नेतृत्व समोर येताना दिसते. विधान परिषदेच्या (Legislative Council Election) नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे हे आता आमदार झालेले आहेत. सत्यजित तांबे म्हणाले, संघर्षाला आम्ही कधीच घाबरलो नाही. आम्ही सातत्याने संघर्ष करत राहिलो. वेळ आली तिथं संघर्ष करत राहिलो. अन्यायविरोधात लढण्याची शिकवण आमच्या आजोबांनी आम्हाला दिली. समाजातील अन्यायविरोधात लढलं पाहिजे. समाजातील घटकांच्या अन्यायविरोधात लढलं पाहिजे. तो करत असतानाचा संघर्ष या नगर जिल्ह्याने जास्त पाहिला आहे.

२००९ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी होती. ती संधी आता मिळाली त्याबद्दल आनंद आहे. आजोबा भाऊसाहेब थोरात यांनी शिकवण दिली की, राजकारणाचा वापर हा सामान्यांचे जीवन बदल घडवून आणण्यासाठी केला गेला पाहिजे. अन्यथा राजकारणाचा काही उपयोग नाही, असंही सत्यजित तांबे यांनी म्हंटलं.

आमदार, खासदार होण्यापेक्षा काम करण्याची संधी मिळणं महत्त्वाचं आहे. मी समाजकारण, राजकारण असतो. यामागचा काही उद्देश आहे. तो उद्देश पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

तांबे-थोरात कुटुंबीय एकच

तांबे आणि थोरात कुटुंबीयांबद्दल गैरसमज पसरविले गेले होते. पण, असं काही नाही. राजकारणामध्ये थोरात-तांबे कुटुंबीय एकच आहेत. आम्ही आमच्या शत्रूलाही शत्रू मानत नाही, असंही सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलं.

विचारांची लढाई विचारांशी

आमचे सगळ्या राजकीय पक्षांशी चांगले सलोख्याचे संबंध आहेत. विचारांची लढाई विचारांनी करतो. राजकारणाची लढाई राजकारणाने करतो. त्यानंतर सगळ्यांशी संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो, असंही सत्यजित तांबे यांनी सांगितलं.

पक्षीय भेदाभेद मानत नाही

गेल्या १५-२० दिवसांत राजकारण घाणेरड्या पातळीवर गेलं होतं. तरीही मोठ्या प्रमाणात यश मिळालं. लोकं आमच्या पाठीशी उभे राहिले. आम्ही पक्षीय भेदाभेद कधी मानत नाही, हे सांगायला सत्यजित तांबे विसरले नाहीत.