रोहित पवारांची संकल्पना, नगरमधील भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा
अहमदनगरला आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.
अहमदनगर : अहमदनगरला आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात देशातील सर्वात मोठा भगवा ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.
सर्वांना एकतेचा संदेश द्यायचाय असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलंय. या झेंड्याखाली सर्व एकत्र येणार असून याच्या पुढे कोणी लहान मोठा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
हा 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहेय. तर या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहे. तसेच, देशातील 74 इतिहास आणि धार्मिक ठिकाणी या ध्वजाचे पूजन झाले असून 36 जिल्हे आणि 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास करून आज खर्डा येथे प्रतिष्ठापना त्याची प्रतिष्ठापना झाली आहे.
संबंधित बातम्या :
जितेंद्र आव्हाड यांच्या अटक आणि सुटकेची बातमी गुप्त का राहिली?, बातमी कशी फुटली?; वाचा सविस्तर