Sangli Car Burn : सांगलीत अंजनी हद्दीत शॉर्टसर्किटने ओमनी कार जळून खाक

अंजनी गावचा आठवडी बाजार गुरुवारी असतो. त्या बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी विनायक सदाशिव पवार व विनायक पाटील दोघेही भाजी घेऊन सदर गाडीतून आले होते. भाजीपाला विक्रीनंतर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जवळच असणाऱ्या सावळज गावातील पेट्रोल पंपावर गेले.

Sangli Car Burn : सांगलीत अंजनी हद्दीत शॉर्टसर्किटने ओमनी कार जळून खाक
सांगलीत अंजनी हद्दीत शॉर्टसर्किटने ओमनी कार जळून खाकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 1:11 AM

सांगली : तासगांव तालुक्यातील अंजनी हद्दीत सावळज रस्त्यावर शॉर्टसर्किटने आग (Fire) लागून ओमनी कार (Car) जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही. आठवडी बाजारात भाजी विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची कार जळाली. सदर घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी घटनास्थळी झाली होती. रस्त्यालगत असणाऱ्या बागेला गाडीच्या आगीच्या झळा बसल्यामुळे नवीनच फुटलेल्या द्राक्षवेलींचेही नुकसान झाले आहे. सदर घटनेची अद्याप पोलिसात नोंद झालेली नाही. (The Omni car was burnt by a short circuit in Anjani area of Sangli)

अचानक वायर जळून कारने पेट घेतला

अंजनी गावचा आठवडी बाजार गुरुवारी असतो. त्या बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी विनायक सदाशिव पवार व विनायक पाटील दोघेही भाजी घेऊन सदर गाडीतून आले होते. भाजीपाला विक्रीनंतर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी जवळच असणाऱ्या सावळज गावातील पेट्रोल पंपावर गेले. सायंकाळी माघारी येताना अंजनी गावाजवळच राजेंद्र पाटील यांच्या बागेजवळ गाडीत आगीच्या ठिणग्या दिसू लागल्या. गाडी गरम होऊन वायर जळाल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे विनायक पवार गाडीच्या बाहेर आले. क्षणार्धातच गाडीने पेट घेतला. गाडी रस्त्याच्या मधोमध पेटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. (The Omni car was burnt by a short circuit in Anjani area of Sangli)

इतर बातम्या

Ulhasnagar : शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयात राहिला कॉटनचा कपडा, शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले जीवदान

Mumbai Drugs Siezed : कोट्यवधींच्या अंमली पदार्थांसह नायजेरियनला मालवणी पोलिसांकडून अटक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.