Akola school : अकोल्यातील शाळेत वादळात छत उडालं, सहा महिने झाले तरी दुरुस्ती नाही, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे!

28 डिसेंबर 2021 ला वादळी पावसाने शाळेची हालत खराब केली. वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले. तेव्हापासून ते आतापर्यंत याची दुरस्ती करून छत बसवण्यात आले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळेला हाल सोसावे लागत आहेत.

Akola school : अकोल्यातील शाळेत वादळात छत उडालं, सहा महिने झाले तरी दुरुस्ती नाही, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे!
अकोल्यातील शाळेत वादळात छत उडालं
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 11:38 PM

अकोला : अकोला जिल्हातल्या बाळापूर (Balapur) तालुक्यातील रिधोरा येथे वादळी पावसाने शाळेची हालत खराब केली. 28 डिसेंबर 2021 ला वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत याची दुरस्ती करुन छत बसवण्यात आले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळेला हाल सोसावे लागत आहेत. शाळेवरील पत्रे उडाल्याने शाळेला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापक (Headmaster) आणि शाळा समितीने जिल्हा परिषदेला निवेदन देऊनही समस्या दूर झालेली नाही. जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावात 125 वर्षे जुनी जिल्हा परिषद शाळा आहे. ही शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. 228 इतकी शाळेची पटसंख्या आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि कोरोनामुळे यंदा शाळा उशिराने सुरू झाल्या. उत्साही वातावरणात विद्यार्थी शाळेत आले. पण, त्यांची निराशा झाल्याचं दिसून येते.

वादळी पावसात उडाली पत्रे

एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची बकाल अवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसल्याने अशा बकाल शाळेतच विद्यार्थांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यातील रिधोरा गावातील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे सहा महिन्यांपूर्वी वादळी पावसात उडून गेले होते. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची डागडूजी आवश्यक होती. पण याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थी छत नसलेल्या शाळेच्या खोलीत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शाळेचे मुख्याध्यापक परमानंद थोटे हेही हतबल झाले आहेत.

सहा महिन्यांपासून छत नाही

शाळेवरील कोसळलेल्या छताखाली विद्यार्थांना बसावे लागले आहे. 28 डिसेंबर 2021 ला वादळी पावसाने शाळेची हालत खराब केली. वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले. तेव्हापासून ते आतापर्यंत याची दुरस्ती करून छत बसवण्यात आले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळेला हाल सोसावे लागत आहेत. याबाबत शाळा समितीचे अध्यक्ष अनिल दंदी यांनी वारंवार जिल्हा परिषदेला निवेदन दिली. आतापर्यंत समस्या दूर झाल्या नाहीत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप गावातील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी केला. लवकरात लवकर शाळेची डागडुजी करुन गळती थांबविण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.