घरातच अवतरले काश्मीर, नंदुरबारमध्ये फुलली केशरची शेती

Saffron of Satpuda | भारतात केशरचे पीक काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. पण एका तरुणाने केशरची सातपुड्यात शेती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान दिमतीला लावत त्याने हा भन्नाट प्रयोग यशस्वी केला आहे. घराजवळील 15 बाय 15 च्या खोलीत त्याने हा प्रयोग केला आहे. त्याच्या या प्रयोगाची चांगलीच चर्चा होत आहे.

घरातच अवतरले काश्मीर, नंदुरबारमध्ये फुलली केशरची शेती
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 3:47 PM

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार | 4 नोव्हेंबर 2023 : काश्मीर या भारताच्या नंदनवनात केशरची शेती केली जाते. पण तुम्हाला कोणी सांगितले की, सातपुड्याच्या कुशीत केशरची शेती करण्यात येते तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण नंदुरबार जिल्ह्यातील तरुणाने हा भन्नाट प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या खेडदिगर या छोट्या खेड्यातील हर्ष मनिष पाटील या तरुणाने केशरची शेती यशस्वी करुन दाखवली. घराजवळील 15 बाय 15 च्या खोलीत त्याने हा प्रयोग केला आहे. केशर उत्पादनासाठी लागणारी वातानुकलीत रुम त्याने तयार केली आणि हा प्रयोग यसश्वी केला. राज्यातील अशाप्रकारचा हा पहिला प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे.

सोन्यासारखा भाव

केशराला सोन्यासारखा भाव आहे. केशर हे तोळ्यावर विक्री होते. दर्जानुसार त्याचा भाव ठरतो. केशर प्रतिग्रॅम 300 ते 1500 रुपयांपर्यंत विक्री होते. काश्मीर, हिमाचल प्रदेशात त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येते. पण मागणीच्या तुलनेत केशरचे उत्पन्न अत्यल्प होते. त्यामुळेच हर्ष पाटीलने हा हाऊस फार्मिंगचा प्रयोग केला आहे.

हे सुद्धा वाचा

हर्ष संगणक पदवीधर

शहादा तालुक्यातील खेडदिगर ही अगदी छोटी वस्ती आहे. हर्ष पाटील हा संगणक पदवधीर आहे. त्याने आधुनिक शेतीची कास धरली. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत केसर उत्पन्न सुरु केले. काश्मीरमधील मोगरा जातीचा केसरच्या फ्लोअर कंद लावून केसर शेती सुरू केली. काश्मीरमधील श्रीनगर लगत असलेल्या पॅमपूर येथून एक हजार रुपये किलो किंमतीने मोगरा जातीचा कंद आणले. घराजवळील 15 बाय 15 च्या खोलीत हा प्रयोग सुरु केला.

केशरसाठी वातानुकूलीत खोली 

हर्षने त्यासाठी वातानुकूलीत खोली तयार केली. थर्माकोल चिकटवून त्याने रुम वातानुकूलीत केली. एक सिड कंद लावल्या नंतर तीन महिन्यात त्यातून तीन-चार केसर निघतात. एक सिड कंदची 8 ते 10 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. एका सिडमधून चार सिड तयार होतात. या प्रयोगाला अडीच ते तीन महिने होत आले आहे. यासाठी हर्षला 5 लाख रुपयांचा खर्च आला आहे. एका फुलामधून तीन केसर बाहेर पडतात. हर्षला या होम फार्मिंगमधून 300 ग्रॅम उत्पन्नाची आशा आहे. बाजारात सध्या एका ग्रॅम केसरचा भाव 500 रुपये असल्याचे त्याने सांगितले. पहिल्या वर्षी खर्चाचे गणित अधिक आहे. पण हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील दोन वर्षांत उत्पन्नात वाढ होऊन खर्चच निघत नाही तर फायदा होतो.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.