Sangli Fire : सांगलीत दुकानाला भीषण आग, आठ गाळे आणि मोटरसायकल जळून खाक

इस्लामपूर पेठ रस्त्यावर संभाजीनगर परिसरात असलेल्या गाळ्यामधील जुन्या दुचाकी विक्रीच्या दुकानाला सर्वप्रथम शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर या दुकानाला लागूनच असलेल्या बेकरी, चहाचे हॉटेल्स यालाही आग लागत गेली. या आगीत अनेक दुचाकीसह या गाळ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

Sangli Fire : सांगलीत दुकानाला भीषण आग, आठ गाळे आणि मोटरसायकल जळून खाक
सांगलीत दुकानाला भीषण आगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 4:17 PM

सांगली : सांगलीच्या इस्लामपूर येथील पेठ रोड वरील दुकान गाळ्यांना लागलेल्या आगी (Fire)त आठ गाळे आणि मोटरसायकली जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका दुकानात शॉर्टसर्किट (Short Circuit) झाल्यामुळे ही दुर्घटना झाली असल्याचे म्हटले जात आहे. एका दुकानात शॉर्टसर्किट झाल्यानंतर शेजारच्या गाळ्यांमध्ये आग पसरत गेली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले आणि आठ गाळ्यांसह मोटारसायकली जळून खाक झाल्या. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. सणासुदीच्या दिवशीच दुर्दैवी घटना घडल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. (The shop in Sangli was gutted by fire, eight shops and few motorcycles were burnt)

शॉर्टसर्किटमुळे दुचाकीच्या दुकानावा प्रथम आग लागली

इस्लामपूर पेठ रस्त्यावर संभाजीनगर परिसरात असलेल्या गाळ्यामधील जुन्या दुचाकी विक्रीच्या दुकानाला सर्वप्रथम शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर या दुकानाला लागूनच असलेल्या बेकरी, चहाचे हॉटेल्स यालाही आग लागत गेली. या आगीत अनेक दुचाकीसह या गाळ्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही आग पसरत गेली आणि आठ गाळे या आगीने आपल्या भक्षस्थानी केले. आग लागल्यानंतर तात्काळ अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अक्षय तृतीया आणि ईदच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयाचे नुसकान झाले आहे. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (The shop in Sangli was gutted by fire, eight shops and few motorcycles were burnt)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.