शेतात सुरू झाल्या गरोदर महिलेला प्रसूतीकळा; आरोग्य सेविकेच्या तत्परतेने बाळ, महिला सुखरूप

प्रसूतीत गुंतागुंत असल्याने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. गरोदर महिला दुचाकीवर बसू शकत नव्हती. शिवाय रुग्णावाहिका शेतापर्यंत जाऊ शकत नव्हती.

शेतात सुरू झाल्या गरोदर महिलेला प्रसूतीकळा; आरोग्य सेविकेच्या तत्परतेने बाळ, महिला सुखरूप
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 5:28 PM

गडचिरोली : जिल्ह्यातील पेरमिलीजवळील चिन्ना कोरली येथील राजे अजय गावडे ही महिला गरोदर होती. डिलिव्हरीसाठी ती भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे माहेरी आली. शेतात काम करत असताना प्रसूतीकळा सुरू झाल्या. वेदना सहन होत नसल्याने ती शेतातील झोपडीपर्यंत पोहचली. घटनेची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका सपना भुरसे यांना देण्यात आली. सपना यांनी जंगलातील शेतात जाऊन गरोदर महिलेची तपासणी केली. प्रसूतीत गुंतागुंत असल्याने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. गरोदर महिला दुचाकीवर बसू शकत नव्हती. शिवाय रुग्णावाहिका शेतापर्यंत जाऊ शकत नव्हती.

चार जणांनी उचलली खाट

आरोग्य सेविकेने तत्परता दाखवली. गरोदर मातेला खाटेवर बसवण्यात आले. चार जणांनी खाट उचलून एक ते दीड किलोमीटरचा प्रवास केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. सातमवाड यांनी गरोदर महिलेची प्रसूती केली. बाळ आणि महिला सुखरूप आहे.

GAD 2 N

बाळ, महिला दोघेही सुखरूप

या महिलेला प्रसूतीच्या दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले होते. पण, तिने सासरी जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महिला प्रसुतीसाठी भरती झाली नव्हती. महिलेच्या तोंडात फोडे झाले होते. त्यामुळे तिला भरती करणे गरजेचे होते. आरोग्य सेविकेने घेतलेल्या निर्णयाने बाळ आणि महिला दोघेही सुखरूप बचावले. त्यामुळे आरोग्य सेविकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माहेरघर योजनेसाठी हवे समुपदेशन

एटापल्ली, भामरागड तालुक्यात पावसाळ्या नदी-नाल्यांना पूर येतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. नदी-नाले ओलांडून रुग्णालय गाठावे लागते. आदिवासी महिलांना धोका पत्करावा लागतो. त्यासाठी माहेरघर ही संकल्पना राबवण्यात येते. गरोदर मातांची तपासणी करून तालुक्याच्या ठिकाणी ठेवण्यात येते. प्रसूती होईपर्यंत देखभाल केली जाते. परंतु, गरोदर माता त्यासाठी तयार झाल्या पाहिजे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.