Akola Sports | तेल्हारा क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट, खेळाडूंचे तहसीलदारांना निवेदन, पोलीस भरतीची तयार कशी करायची?
तेल्हारा तालुका क्रीडा संकुलच्या मैदानाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप खेळाडूंकडून होत आहे. या मैदानावर खेळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्याकरिता खेळाडूंनी अनेकदा संबंधितांना निवेदनाद्वारे योग्य धावपट्टीची, मैदानाची मागणी केली. तरीसुद्धा धावपट्टीचे काम निकृष्ट होत आहे.
अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात खेळाडूंची संख्या मोठी आहे. तेल्हारा तालुक्यातील खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केली. तालुक्यातील देशसेवेत गेलेले युवा यांची यादी लांब आहे. त्यांच्याच पाऊलावर पाउल टाकण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील युवा वर्ग मेहनत घेत आहे. खेळाडूंसाठी धावपट्टी तयार केली जात आहे. तेल्हारा तालुका क्रीडा संकुलासाठी (Taluka Sports Complex) मंजूर झालेला निधी खर्च करून धावपट्टी ( Runway) तयार करण्यात येत आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याचे युवकांचे म्हणणे आहे. यामध्ये आवश्यक प्रमाणात मुरूम न टाकता आधी उखारलेली मातीच येथे टाकण्यात येत आहे. तसेच मुरुमाऐवजी विटांचा वापर होत असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे खेळाडूंना इजा होऊ शकते. परंतु याकडे तालुका क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी खेळाडूंकडून वारंवार तक्रारी होत आहेत. हे मैदान खेळाडूंना खेळण्यास योग्य नाही. या क्रीडा मैदानाच्या दुरवस्थेबाबत तालुक्यातील युवकांनी याआधी सुद्धा क्रीडामंत्री (Minister of Sports), नगराध्यक्ष, जिल्हा क्रीडा अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.
धावपट्टी खोदून ठेवली
आता पुढे महाराष्ट्र पोलीस भरती, सेना भरती आहे. परंतु कित्येक दिवसांपासून खोदून ठेवलेल्या धावपट्टीमुळं या युवकांना सराव करता येत नाही. तसेच आता सुरू असलेल्या निकृष्ट कामाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील युवक आज येत्या 18 जून रोजी तेल्हारा तहसीलदार यांच्या दालनात गेले. काम चांगलं व्हावं, यासाठी निवेदन दिलं. याची तक्रार क्रीडामंत्र्यांकडंही करण्यात येणार आहे.
धावपट्टी योग्य हवी
तेल्हारा तालुका क्रीडा संकुलच्या मैदानाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप खेळाडूंकडून होत आहे. या मैदानावर खेळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्याकरिता खेळाडूंनी अनेकदा संबंधितांना निवेदनाद्वारे योग्य धावपट्टीची, मैदानाची मागणी केली. तरीसुद्धा धावपट्टीचे काम निकृष्ट होत आहे. त्यामुळं खेळाडू युवकांनी हे कठोर पाउल उचलण्याचे ठरविले आहे. धावपट्टीसाठी मुरुम टाकणे आवश्यक आहे. पण, कुठं माती, तर कुठं विटांचे तुकडे वापरले जात आहेत. त्यामुळं धावपट्टीवर धावताना इजा होण्याची शक्यता आहे. हे होऊ नये, यासाठी चांगली धावपट्टी तयार करणे आवश्यक आहे.