या आमदाराने गाजविली ग्रामपंचायत निवडणूक; 36 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
राजुरा विधानसभा क्षेत्रातील 94 पैकी 36 ग्रामपंचायतेवर काँग्रेसने विजय मिळविला.
निलेश डाहाट, TV9 मराठी, प्रतिनिधी, चंद्रपूर : राजुरा विधानसभा (Rajura Assembly) क्षेत्रातील ग्रामपंचायतेच्या लागला. निकालाने काँग्रेस पक्षात जलोषाचे वातावरण आहे. 94 ग्रामपंचायतींपैकी 36 ग्रामपंचायतेवर (Gram Panchayat Election) काँग्रेसचे सरपंच विराजमान झाले आहेत. काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी गड राखला आहे. तर जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायतींवर कमळ फुलले आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीने मोठी उसंडी मारीत 6 जागा जिंकल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील सहा ग्रामपंचायती आधीच अविरोध निवडल्या गेल्या आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रातील 94 पैकी 36 ग्रामपंचायतेवर काँग्रेसने विजय मिळविला. जिह्यात एकूण 94 पैकी काँग्रेसने 36 जागा ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. भाजपने जिल्ह्यात 30 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.
भंडारा जिल्ह्यात आज झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी एकूण 9 अपक्ष सरपंच म्हणून निवडून आले. मात्र त्यांनी आता शिंदे गटाला उघडपणे समर्थन दिले. आता शिंदे गटाच्या सरपंचांची संख्या 12 वर पोहोचली आहे. 137 पैकी 80 सदस्य ही निवडून आले आहेत.
आता भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक सरपंच निवडून आणणारा पक्ष म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेवृत्वात असणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट यांची ताकद वाढली आहे.
गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना धक्का बसला. राष्ट्रवादीला एकही ग्रामपंचायत जिंकता आली नाही. 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 4 भाजप तर एक काँग्रेसनं जिंकली. राष्ट्रवादीला खातं खोलता आलं नाही. त्यामुळं गोंदिया राष्ट्रवादीचा होमवर्क वाढला आहे.