पुरातून महिंद्रा कॅम्पर काढण्याचे धाडस, तीन अभियंते वाहून गेले, त्यानंतर घडली ही थरारक घटना

भामरागड तालुक्याचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे पूर परिस्थितीमुळे तुटला. भामरागड तालुक्यातील 50 गावे जिल्हा मुख्यालयाशी संपर्काच्या बाहेर आहेत.

पुरातून महिंद्रा कॅम्पर काढण्याचे धाडस, तीन अभियंते वाहून गेले, त्यानंतर घडली ही थरारक घटना
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 9:24 PM

गडचिरोली : विदर्भात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. नदी-नाले दुथळी भरून वाहत आहेत. नदी-नाल्यांना पूर आला. या पुरातून काही जण गाड्या काढण्याचा प्रयत्न करत होते. यापैकी एक मोठी घटना समोर आली. यात तीन अभियंते पुरातून गाडी काढण्याचे धाडस करत होते. बांडे नदीत पुराच्या पाण्यातून वाहन काढण्याचा अट्टहास तीन अभियंतांना अद्यल घडवून गेला. हे तीन अभियंते बाल-बाल बचावले. मात्र, महिंद्रा कॅम्पर पाण्यात वाहून गेली. एटापल्ली नजीकच्या बांडे नदीला पूर आला. मार्गावरून वेगाने वाहत असलेल्या पाण्यात सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचे तीन अभियंत्यांनी महिंद्रा कॅम्पर वाहन पुरात टाकले.

पाण्याचा प्रभाव जास्त होता. त्यामुळे वाहन पाण्यात वाहून गेले. परंतु वृक्षाच्या साह्याने तीन अभियंते बाल बाल बचावले. बाहेर सुरक्षित बाहेर पडले. महिंद्रा कॅम्पर वाहन काही भागापर्यंत वाहून गेली. मोठी जीवितहानी टळली तरी अभियंताच्या हट्टामुळे एक भीतीचे वातावरण सध्या निर्माण झाले होते.

भामरागड तालुक्यातील ५० गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे पूर परिस्थितीमुळे तुटला. भामरागड तालुक्यातील 50 गावे जिल्हा मुख्यालयाशी संपर्काच्या बाहेर आहेत. आलापल्ली, भामरागड राष्ट्रीय महामार्गावरील परलकोटा पुलावर दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यात 117 मिलीमीटर पाऊस तर एटापली तालुक्यात 180 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील जवळपास 12 मुख्य मार्ग बंद

चातगाव -कारवाफा-पोटेगाव-पावीमुरांडा-घोट रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगावजवळ लोकल नाला, देवापूरजवळील नाला)

कुनघाडा-गिलगाव पोटेगाव रस्ता (पोटेगावजवळ)

तळोधी-आमगाव-एटापल्ली-परसलगोंदी-गट्टा रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी)

तळोधी आमगाव एटापल्ली परसलगोंदी गट्टा रस्ता (बांडीया नदी)

अहेरी-आलापल्ली-मुलचेरा रस्ता (गोमणी नाला)

अहेरी आलापल्ली मुलचेरा घोट रस्ता (कोपरअलीजवळील नाला)

अहेरी-मोयाबीनपेठा-वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला)

आलापल्ली-ताडगाव-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी)

आलापल्ली-ताडगाव-भामरागड-लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) आणि (बिनागुंडा नाला)

कसनसूर-एटापल्ली-आलापल्ली रस्ता राज्यमार्ग (करमपल्लीजवळील नाला, एलचिलजवळील नाला)

कसनसूर एटापल्ली आलापल्ली रस्ता (एटापल्लीजवळील नाला)

आष्टी–गोंडपिपरी-चंद्रपूर

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.