अकोला : जिल्ह्यातल्या सोनखास मोजर (Sonkhas Moser) शेतशिवारालगत वन परिक्षेत्र आहे. या वन परिक्षेत्राला (Forest Range) लागून असलेल्या नदी पात्राच्या जवळ पट्टेदार वाघाचा मृतदेह सापडला. आज सकाळच्या सुमारास शेताकडे जात असताना शेतकऱ्याला ( farmer) हा वाघाचा मृतदेह आढळला. सोनखास मोजर या गावालगत संपूर्ण वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रामध्ये नेहमीच पट्टेदार वाघाचा वावर असतो. नेमका या पट्टेदार वाघाचा मृत्यू कसा झाला हे कळू शकले नाही. वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहचले आहेत. अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात येत असलेल्या मोझरी खु.शिवारातील जंगलात वाघाचा मृत्यू झालाय. घटनास्थळी वनविभाग पिंजरचे कर्मचारी पोहचले आहेत. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरचे जवान रुग्णवाहिकासह दाखल झालेत.
मोझरी खुर्द शिवारात आज शेतकरी जात होता. त्याला जंगलात वाघाचा मृतेदह दिसला. त्यानं वनविभागाला कळविलं. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या वाघाच्या मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. वनविभागाचे कर्मचारी याचा तपास करत आहेत. या वाघाच्या मृत्यूच्या कारणांचा शोध वनविभाग घेत आहे. तोपर्यंत मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
या परिसरात वाघाचा वावर असतो. त्यामुळं कुणी शिकार तर केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा वाघ पट्टेदार आहे. शरीर संपूर्ण तसंच पडलेलं आहे. त्यामुळं शिकारीची शक्यता कमी व्यक्त केली जात आहे. तरीही सर्व बाजूनं वनविभागाचे कर्मचारी या घटनेचा तपास करत आहेत. हा मृतावस्थेतील वाघ पाहण्यासाठी नागिरांनी गर्दी केली होती. पट्टेदार वाघाचा या भागात वावर होता. कधीकधी तो काही लोकांना दिसायचा. मोझरी खुर्द शिवारातील जंगलात हा वाघ मृतावस्थेत सापडला. घटनास्थळी वनविभाग पिंजरचे कर्मचारी पोहचले. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरचे जवान रुग्णवाहिकासह दाखल झाले. पुढील कारवाई ते करत आहेत.