Chandrapur News | शिक्षिकेला थेट रस्त्यावरच वाहिली श्रद्धांजली, चंद्रपुरात नेमकं काय घडलं?
जनविकास सेना संघटनेने विविध मार्गांवर गतिरोधकाची मागणी केली होती. त्याला आता दीड वर्ष लोटले. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी चंद्रपूर-नागपूर मार्गावर अपघात झाला. भरधाव ट्रकने अनिता ठाकरे नामक शिक्षिकेचा बळी घेतला. त्यानंतर या रस्त्यावर आणखी दोन अपघात झाले.
निलेश डाहाट, प्रतिनिधी, ६ सप्टेंबर २०२३ चंद्रपूर : येथील रिंग रोडवर 4 सप्टेंबर रोजी तीन अपघात झाले. रिंग रोडवर गाड्या उभ्या असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाहनं ठेवण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर गाड्या उभ्या राहतात. हा इंडस्ट्रीयल भाग आहे. या भागातून कोळसा, अॅश, सिमेंट यांची वाहतूक होते. शहराला बायपास असा रस्ता नाही. त्यामुळे अपघातात वाढ होत असल्याचं चित्र आहे. माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या रिंग रोडवर ब्रेकर तयार करण्याची मागणी केली होती. पण, हायवे असल्यामुळे नियमानुसार ब्रेकर लावता येत नसल्याची माहिती आहे. या अपघातात वाढ होत असल्याने हायवेवर ब्रेकर लावावे. अन्यथा ८ दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अपघातात शिक्षिकेचा बळी
स्थानिक जनविकास सेना संघटनेने विविध मार्गांवर गतिरोधकाची मागणी केली होती. त्याला आता दीड वर्ष लोटले. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी चंद्रपूर-नागपूर मार्गावर अपघात झाला. भरधाव ट्रकने अनिता ठाकरे नामक शिक्षिकेचा बळी घेतला. त्यानंतर या रस्त्यावर आणखी दोन अपघात झाले. या महामार्गावर नेहमी अपघात होत असतात.
जिथं अपघात तिथंच श्रद्धांजली
स्थानिक कार्यकर्त्यांनी जनविकास सेनेच्या पुढाकाराने अपघातस्थळी श्रद्धांजली स्वरूप आंदोलन केला. आंदोलक आणि पोलिसांची झटापट झाली. मात्र, नंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. श्रद्धांजली कार्यक्रमाची परवानगी दिली. ज्या शिक्षिकेचा चंद्रपूर रिंग रोडवर अपघात झाला. त्या शिक्षिकेला तेथेच तीन दिवसांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. जनविकास सेनेच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले.
माजी नगरसेवकाचा आरोप काय?
केवळ हप्ते आणि स्वार्थामुळे चंद्रपूरच्या रिंग रोड रखडला. त्यामुळे अपघातात वाढ झाल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलाय. शिक्षिकेला थेट रस्त्यावरच श्रद्धांजली वाहून प्रशासकीय ढिम्म कारभाराचा अनोखा निषेध नोंदविण्यात आला. आता तरी या रिंग रोडवर ब्रेकर होते की, नाही हे पाहावं लागेल. पुन्हा अपघात झाल्यास नागरिकांचा आक्रोश वाढल्याशिवाय राहणार नाही.