सांगली : जत तालुक्यातील धावडवाडी जवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत अडीच वर्षाचा चिमुरडा ठार (Death) झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी घडली आहे. अब्दुल समद साजिद शेख असे दुर्दैवी चिमुरड्याचे नाव आहे. हेडलाईटला अडीच वर्षीय अब्दुल शेख हा चिमुरडा (Boy) अडकल्याने चालकाने सात किलोमीटरपर्यंत चिमुरड्याला फरफटत नेले. अपघातानंतर गावकर्यांनी त्या इंडिका गाडीचा पाठलाग करून त्या वाहन चालकाला बेदम मारहाण करत कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. महादेव कुंडले असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. यामध्ये साजीद खान शेख व जबीन शेख हे गंभीर जखमी (Injured) झाल्याने त्यांना उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Two-and-a-half-year-old boy killed in Indica car and bullet accident in Sangli)
साजिद खान नालसाब शेख व जबीन शेख हे दाम्पत्य कामानिमित्त बुलेट गाडीवरून आपल्या अडीच वर्षीय चिमुरड्याला घेऊन धावडवाडी गावात आले होते. धावडवाडी गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अनेक वाहने ये जा करतात. शेख दाम्पत्य आपले काम आटपून शेताकडे जात होते. यावेळी कारचालक महादेव मधुकर कुंडले हा चालक आपली इंडिका गाडी घेऊन मोकाशी वाडी येथील भाडेखोर यांना घेऊन सांगलीकडे निघाला होता. धावडवाडीजवळ शेख दाम्पत्य आपल्या चिमुरड्या मुलासमावेत शेताकडे जात असताना त्यांच्या बुलेट गाडीला इंडिका गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत साजिद खान शेख(27) व जबीन शेख (25)हे दोघे दाम्पत्य जागेवर खाली कोसळले व अडीच वर्षीय अब्दुल समद शेख हा चिमुरडा इंडिका गाडीच्या धडकेत ठार झाला. हेडलाईटला अडीच वर्षीय अब्दुल शेख हा चिमुरडा अडकल्याने चालकाने सात किलोमीटरपर्यंत चिमुरड्याला फरफटत नेले. चोरुची गावानजीक आल्यानंतर त्याला लक्षात येताच त्याने गाडी थांबवून त्या चिमुरड्याला खाली उतरवले. (Two-and-a-half-year-old boy killed in Indica car and bullet accident in Sangli)
इतर बातम्या
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून बंदुक रोखली, सहा जणांवर गुन्हा दाखल