इचलकरंजी : शहरातील बनावट नोटा प्रकरण मोठे चर्चेत असतानाच आता तपासादरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून 11 लाखांच्या 19 हजार रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. तानाजी सुळेकर आणि राजू भाई लवंगे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट नोटांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेळगाव येथील एका व्यापाऱ्याने ओरिजनल तीन लाख रुपये नोटांच्या बदली दहा लाख रुपयाच्या खोट्या नोटा द्या असे सांगितले होते. त्यासाठी या नोटा छपाई करण्यात आल्या होत्या. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे बनावट नोटा रॅकेट प्रकरण उघडकीस आले आहे. (Two arrested in Ichalkaranji counterfeit note case, Shivajinagar police take action)
इचलकरंजी शहरातील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेत एका व्यक्तीकडून बनावट नोटांचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक करुन याप्रकरणाचा अधिक कसून तपास सुरु केला. या तपासादरम्यान शिवाजीनगर पोलिसांना या बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे करवीर तालुक्यातील कोपर्डे गावापर्यंत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून सुमन शॉपीचा दुकानचालक तानाजी सुळेकर याला ताब्यात घेतले. तसेच कळंबा येथील राजू भाई लवंगे याच्याकडून सुमारे 11 लाख 19 हजार रुपयांच्या बनावट नोटा, दुकानातील संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बनावट शिक्के, बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र साहित्य व इतर साहित्यही शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केले आहे. बनावट नोटांमध्ये 100, 200, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
सदर संशयित आरोपी तानाजी सुळेकर याने कुंभी कासारी परिसरात अशा बनावट चलनी नोटा व्यवहारात किती आणल्या आहेत हे पूर्ण तपासाअंती समजणार आहे. आरोपीचा इचलकरंजीसह कोल्हापूर शहर आणि कर्नाटकातील अनेक गावांशी संपर्क असल्याचे कळते. यामुळे कुंभी परिसरात बनावट नोटांमुळे मोठी खळबळ माजली आहे. लॉकडाऊन काळामध्ये दुकाने बंद असल्यामुळे नामी शक्कल या आरोपींनी लगावली होती. तानाजी सुळेकर याच्यावर 2008 सली बनावट शिक्के बनवण्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. यानंतर तानाजी बनावट नोटा बनवून जिल्ह्यामध्ये आपल्या पाहुणे मंडळीकडे देत होता. त्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये आंतरराज्य टोळी असल्याचे समजते. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Two arrested in Ichalkaranji counterfeit note case, Shivajinagar police take action)
पालकांना मोठा दिलासा, अखेर जीआर निघाला, शाळांच्या 15 टक्के फी कपातhttps://t.co/ccRmDFkr0E#educationdepartment #maharashtragovernment #SchoolFeeCutGR
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2021
इतर बातम्या
नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा आघाडीचा डाव, पण पालिकेत भाजपचीच सत्ता येणार: फडणवीस
कोरोना लसीबाबत अफवा पसरवणारे 100 हून अधिक अकाऊंट्स फेसबुककडून बॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण