लाँग मार्चमधील आंदोलनकर्त्या 2 शेतकऱ्यांना आली भोवळ; रुग्णालयात केले दाखल…
अकोले येथून निघालेल्या मोर्चा आता 12 किमी चालून आता पहिल्या मुक्कामी थांबला आहे. त्यातच किसान सभेचा लाँगमार्चमधी दोन शेतकऱ्यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अकोले / अहमदनगर : अकोले येथून निघालेला किसान लाँगमार्च 12 किलोमीटर अंतर पायी चालत पहिल्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचला आहे. मोर्चेकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असली तरी अनेक मोर्चेकरी आपल्या सोबतच आपले जेवण घेऊन चालू लागले आहेत. या मोर्चामध्ये अनेक महिलांनी मोर्चा मुक्कामी पोहचल्यानंतर भाकरी आणि चटणीचा आस्वाद घेतला आहे. तर शालेय पोषण आहार तयार कर्मचारी महिलादेखील या मोर्चामध्ये मोठया संख्येने सहभागी आहेत. आम्हाला आजही 50 रुपये रोजंदारीवर काम करावे लागत आहे.
त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. कितीही त्रास झाला तरी चालेल मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलने करतच राहणार असा इशारा या महिलांनी दिला आहे.
किसान मोर्चा लॉंगमार्चचा पहिला मुक्काम धांदरफळ येथे पोहचला आहे. मोर्चा पहिल्या मुक्काम स्थळी पोहचला असला तरी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असंही ठामपणे मोर्चातील महिलांनी सांगितले आहे.
हा मोर्चा सुरु होण्यापासूनच सोबत आणलेल्या भाकरी आणि चटणीचा आंदोलकांनी मुक्कामी असलेल्या ठिकाणी आस्वाद घेतला आहे.
अकोले येथून निघालेल्या मोर्चा आता 12 किमी चालून आता पहिल्या मुक्कामी थांबला आहे. त्यातच किसान सभेचा लाँगमार्चमधी दोन शेतकऱ्यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये दोन आंदोलकांना भोवळ आली होती.
त्यांच्यावर आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. अकोले तालुक्यातील वाडा गावातील शेतकरी गंगाराम भोईर तर दुसरा आंदोलक जयराम घालणार हे पालघर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुक्काम स्थळी एका शेतकऱ्यांवर रुग्णवाहिकेतच उपचार करण्यात आले असून आता दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.