Nanded Accident : नांदेडमध्ये कार आणि मोटारसायकलमध्ये अपघात; दोन ठार तर दोन गंभीर जखमी

गंगाधर माझळकर आणि केरबा हुरदूके हे दोन तरुण हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील रहिवासी आहेत. दोघेही दुचाकीने वाळकेवाडी या आपल्या गावी येत होते. यावेळी हिमायतनगर ते भोकर महामार्गावरील सरसम गावाजवळ येताच भोकरकडून भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली.

Nanded Accident : नांदेडमध्ये कार आणि मोटारसायकलमध्ये अपघात; दोन ठार तर दोन गंभीर जखमी
नांदेडमध्ये कार आणि मोटारसायकलमध्ये अपघात
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 5:56 PM

नांदेड : कार आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघाता (Accident)त दोन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेडच्या हिमायतनगर ते भोकर महामार्गावरील सरसम या गावाजवळ दुपारी चार वाजता हा अपघात झाला. गंगाधर माझळकर आणि केरबा हुरदूके अशी अपघातात ठार झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Two killed, two injured in car-motorcycle accident in Nanded)

गंगाधर माझळकर आणि केरबा हुरदूके हे दोन तरुण हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील रहिवासी आहेत. दोघेही दुचाकीने वाळकेवाडी या आपल्या गावी येत होते. यावेळी हिमायतनगर ते भोकर महामार्गावरील सरसम गावाजवळ येताच भोकरकडून भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंगाधर आणि केरबा हे दोन तरुण जागीच ठार झाले.

नाशिकमध्ये कार आणि मोटारसायकल अपघातात तरुण जखमी

नाशिक शहरातील सातपूर येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोटारसायकल आणि चारचाकी गाडीचा समोरासमोर अपघात होऊन यात एक 30 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. अपघाताचे दृश्य सीसीटिव्हीत कैद झाले आहे. गंधर्व नंदा शाहू असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंधर्व हा रात्री काही कामानिमित्त घराबाहेर आला होता. काम संपवून शिवाजीनगरकडे जात असताना कारने अचानक घेतलेल्या वळणामुळे मोटारसायकल कारवर आदळली आणि गंधर्व कारच्या बोनेटला लागून लांब फेकला गेला. यात गंधर्व गंभीर जखमी झाला. (Two killed, two injured in car-motorcycle accident in Nanded)

इतर बातम्या

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या

कल्याणमध्ये कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरण, व्यवसायिक वादातून दिली सुपारी, सहा आरोपी ताब्यात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.