व्येंकटेश दुडमवार, टीव्ही 9 मराठी, गडचिरोली / 14 ऑगस्ट 2023 : पिकनिकला गेलेल्या दोन जणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गडचिरोलीत घडली आहे. सिरोंचा तालुका येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. मयतांपैकी एक अल्पवयीन आहे. हिमांशू मून असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिरोंचा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सिरोंचा पोलीस पुढील तपास करत आहेत. दोघेही नागपूर येथील रहिवासी आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. यामुळे नदीवर अंघोळीसाठी टाळण्याचे आवाहन करुनही तरुण मंडळी ऐकत नाहीत. यातूनच अशा घटना घडत नाहीत.
हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह एका कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता. तेथून तो आपला मित्र सुमन मुंसेट्टी याला भेटण्यासाठी सिरोंचाजवळील चिंतलपल्ली येथे गेला. तेथून सर्व मित्रांनी गोदावरी नदीवरील नरगम घाटावर अंघोळीचा बेत केला. सर्वजण नरगम घाटावर पोहचले आणि अंघोळीसाठी नदीत उतरले. नागपूर जिल्ह्यातील पाच मित्र गडचिरोलीतील सिरोंचा येथील नरगम नदी घाटावर पिकनिकला गेले होते.
नदीत अंघोळीसाठी उतरल्यानंतर खोल पाण्यात सर्वजण बुडू लागले. मात्र तिघे जण कसेबसे जीव वाचवून पाण्यातून बाहेर पडले. मात्र हिमांशु आणि सुमन पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवले.