पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही…

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही...
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 7:48 PM

शंकर देवकुळे, प्रतिनिधी,  सांगली : रविराज हा सातव्या वर्गात शिकतो. तर अमोल हा दहाव्या वर्गात शिकत होता. आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल म्हणून तो वाट पाहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दोघेही नदी परिसरात गेले. पण, दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील वारणा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावातील परिसरात आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

काल दुपारी २ च्या सुमारास अमोल प्रकाश सुतार (वय १६ वर्षे, रा.तांदुळवाडी) आणि सुट्टीनिमित्त आलेला आपला मावस भाऊ रविराज उत्तम सुतार (वय वर्षे १२, रा. कराड तालुक्यातील राजमाची) याला घेऊन वैरण काढायला नदीत गेले. ते वारणा नदीकाठावर गेले.

दोघांचाही बुडून मृत्यू

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने दोघांचेही प्रेत पाण्यातून बाहेर काढलेत.

हे सुद्धा वाचा

रविराज आला होता मावशीकडे

रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो सातव्या वर्गात शिकत होता. त्याचे आई वडील हे रोजंदारी करतात. आज रविराजचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची आणि रविराज याच्या घरी शोककळा पसरली आहे.

अमोलने दिली होती दहावीची परीक्षा

अमोल प्रकाश सुतार हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच आहे. तरुण मुलगा मृत्यू झाल्याने घरावर दुखाचा डोंगर कोसळले आहे. सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.