डिजे वाजवण्यासाठी चालले होते, पण एका चप्पलने होत्यांचे नव्हते केले !

एका कार्यक्रमात डीजे वाजवण्यासाठी सहा तरुण टाटा एस गाडीने चालले होते. मात्र डीजे वाजवण्यापूर्वीच घात झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

डिजे वाजवण्यासाठी चालले होते, पण एका चप्पलने होत्यांचे नव्हते केले !
डीजे वाजवायला चाललेल्या तरुणांचा अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 1:04 PM

चंद्रपूर / निलेश डहाट : एका कार्यक्रमात डिजे वाजवण्यासाठी जात असतानाच गाडी अनियंत्रित झाली आणि झाडावर आदळली. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा – चिंतलधाबा रस्त्यावरील सोनापूर फाट्याजवळ हा अपघात झाला. आनंद बोलमवार आणि अमन भोयर अशी मयत तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. सर्व जखमींना उपचारासाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले.

एक्सलेटरमध्ये चप्पल अडकली अन् घात झाला

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा-चिंतलधाबा रस्त्यावरील सोनापूर फाट्याजवळ विठ्ठलवाडा येथे एका कार्यक्रमात डिजे वाजवण्यासाठी सर्व तरुण टाटा एस गाडीने चालले होते. यावेळी महामार्गावर वाहन बाजूला घेत असताना चालकाची चप्पल एक्सलेटरमध्ये अडकली. यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या धडकेत दोन ठार तर चार गंभीर जखमी झाले. आनंद बोलमवार आणि अमन भोयर या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलवले

गोलू देशमुख, लक्ष्मण बावणकर, चालक गितेश्वर बावणे, आयुष लाकडे हे चौघे जण गंभीर जखमी झाले.सर्व जखमींना पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. यातील मृतक आनंद बोलमवार डीजे ऑपरेटर होता. पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.