रत्नागिरी: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेते नबाव मलिक यांच्यावर केलेल्या आरोपावर शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया नोंदवलीय. गेले पंधरा वीस दिवस लवंगी आणि बॉम्ब सर्वच आपण बघतोय. पण विरोधी पक्ष नेत्यांनी बॉम्ब फोडलाय का याची मला माहित नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्यावर माहिती घेवून बोलणं उचित राहिल. असं सांगत फडणवीस यांच्या आरोपांवर उदय सामंत यांनी बोलणं टाळलं.
देगलूरचा किंवा दादरा हवेली निकाल आपण पाहिला असेल त्याच निकालाची पुनरावृत्ती पुन्हा होणार आहे. मागच्या विधानपरिषदेच्या पाच जागांवर निवडणुका झाल्या होत्या. त्या पाच ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता ज्या ज्या निवडणुका होतील पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदारांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन झालेलं दिसेल आणि या निवडणुका सुद्धा आम्ही जिंकू, असा दावा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलाय.
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला मान्यता मिळाल्याचं इंटरनेटवर आम्ही पाहिलं. पण काही तासात त्यातील अँप्रुव्ह हाच शब्द गायब झाला. सिंधुदुर्गात कशा प्रकारे चांगले मेडिकल कॉलेजच्या पायाभूत सुविधा आहेत, हे केंद्रीय आरोग्य पथकांनी पुन्हा पाहायला यावे. कदाचित केंद्रीय समितीचा गैरसमज झाला असेल. आम्ही अजून हरलेलो नाही. जादू जशी होते तशी चोविस तासात मान्यता रद्द झाली. पण, सिंधुदुर्गवासीयांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रद्द कसं झालं हे चांगले माहिती आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही सिंधुदुर्गमधील वैद्यकिय महाविद्यालय सुरु करणार असं सांगत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाराय़ण राणे यांचे नाव न घेता चिमटे काढलेत. तर आदर्श वैद्यकिय महाविद्यालय सिंधुदुर्गात नक्की सुरु करणार असल्याचा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.
इतर बातम्या:
Fadnavis VS Malik | देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप
बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली
Uday Samant gave secure comment on the allegations of Devendra Fadnavis and Nawab Malik on each other