Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामगारांबद्दल बोलल्यावर माझ्यावर 2 लाखांच्या खंडणीची केस; चिंधीचोर वाटलो का? MIDC च्या दुरावस्थेवर उदयनराजे भोसले आक्रमक

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी आज साताऱ्यात (Satara) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा एमआयडीसी (MIDC) आणि पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगारांच्या प्रश्नी भाष्य केलं.

कामगारांबद्दल बोलल्यावर माझ्यावर 2 लाखांच्या खंडणीची केस; चिंधीचोर वाटलो का? MIDC च्या दुरावस्थेवर उदयनराजे भोसले आक्रमक
उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 7:10 AM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी आज साताऱ्यात (Satara) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा एमआयडीसी (MIDC) आणि पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगारांच्या प्रश्नी भाष्य केलं. सातारा एमआयडीसी आणि अहमदनगर एमआयडीसी या एकाच वेळी सुरु झाल्या. अहमदनगरच्या एमआयडीसीची प्रगती झाली आणि सातारच्या एमआयडीसीची काय स्थिती झालीय. सातारा एमआयडीसीतील अनेक कंपन्या बाहेर गेल्या. मी कामगारांच्या प्रश्नी आवाज उठवला तर माझ्यावर 2 लाख रुपयांच्या खंडणीची केस टाकली. माझी ही अवस्था असेल तर कामगारांचं काय करतील. 2 लाख रुपयांची केस टाकता चिंधी चोर वाटलो काय? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला. अहमदगनरच्या तत्कालीन राजकीय नेत्यांना जे जमलं ते साताऱ्यातील त्यावेळच्या खासदार, आमदार यांना का जमलं नाही, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?

सातारची एमआयडीसी ही भारतातील प्रमुख हायवे सुवर्ण चतुष्कोनला लागून आहे. आज अहमदनगरच्या एमआयडीसीची प्रगती आणि सातारच्या एमआयडीसीची दुर्दशा यावर प्रत्येकानं आत्मपरीक्षण करायला हवं. या प्रकरणी बोललं की इतरांना राजकीय षडयंत्र वाटतं. 1974 साली मी लहान होतो, त्यावेळी राजकारणात नव्हतो. त्यावेळचे लोकप्रतिनिधी होते. त्यावेळच्या नगरच्या लोकप्रतिनिधींना जे जमलं त्यावेळी साताऱ्यातील लोकप्रतिनिधींना का जमलं नाही. सातारा एमआयडीसी ही आजारी एमआय़डीसी म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. एल अँड टी सारख्या इतर कंपण्या सातारा एमआयडीसीत आल्या नाहीत. कोयना आणि इतर 11 धरणं असून एमआयडीसी माळावर का गेल्या. हे प्रश्न विचारले तर कामगारांना गुन्हेगार ठरवलं जातं. हे दुर्दैवी आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

लोकांच्या वेदना समजून घेण्यासाठी ह्रदय लागतं

कारखानदारी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कोणत्या किमतीवर कारखानदारी करणार? लोकांच्या किमतीवर का? बँकांनी कर्ज दिलं होतं तर वसूल झालं पाहिजे. ती जागा 42 कोटी रुपयांची आहे. लोक रॉकेल ओतून घेत आहेत हे दिल्लीत टीव्हीवर पाहिलं. ज्या लोकांनी तुम्हाला, मला त्या पदावर बसवलंय. कामगारांच्या वेदना समजून घ्यायला ह्रदय लागतं. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात मी भांडलोय. माझ्यावर अनेक केसेस झाल्यात. पंडित ऑटोमोटिव्हची जागा 42 कोटींची आहे तर मी 16 कोटी रुपये देणारी लोक देतो. सर्वांची देणी देऊन टाका. बँकांची कुणाला पडलेली नाही. एमआयडीसीचं कुणाला पडलेलं नाही. एमआयडीसीतील ज्या कंपन्या निघून गेल्या त्यांना जाऊन विचारा. मी ज्यावेळी आवाज उठवला त्यावेळी माझ्यावर पोलीस केसेस झाल्या. भूमिपूत्रांना रोजगारात प्राधान्य द्यावं, असे नियम आहेत. मी आवाज उठवला तर माझ्यावर 2 लाखांची केस टाकली. यांचं काय करतील ते लोकं चिंध्या करुन टाकतील. मात्र, कामगारांनी घाबरू नये मी पाठिशी आहे. एमआयडीसीची वाढ व्हावी, प्रगती व्हावी या मताचा मी आहे. 2 लाखांची खंडणी चिंधी चोर वाटलो का? लोकांची प्रगती कशी होणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

अधिवेशनावरुन आल्यानंतर बोलू

सातारा एमआयडीसी मधील पंडित ऑटोमोटिव्ह ही कंपनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बेकायदेशीररीत्या खरेदी केल्याचा आरोप कामगारांनी केला होता.या कामगारांच्या या लढ्यात खासदार उदयनराजे भोसले देखील उडी घेतली. सातारा एमआयडीसीमध्ये चाललेल्या भोंगळ कारभारा बाबत पत्रकारांशी बोलताना राग व्यक्त केला आहे. कामगारांची देणी देऊ टाका, तोपर्यंत नोंदणी करु नका. एमआयडीसीच्या संपूर्ण कामकाजाचा तपशील द्या. अधिवेशनावरुन आल्यानंतर बोलू, असं उदयनराजे भोसले म्हणाले. कोर्टाकडून न्यायालयीन चौकशीची मागणी करा, मी देखील पत्रव्यवहार करणार असल्याचं खासदार भोसले म्हणाले.

पाहा व्हिडीओ:

इतर बातम्या:

Chhattisgad Crime : छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार, मोबाईलवरील व्हिडिओ पाहून केले कृत्य

केरळची महिला अबुधाबीमध्ये मालामाल, जिंकली तब्बल 44.75 कोटी रुपयांची लॉटरी

Udayanraje Bhonsle statement on MIDC and Pandit Automotive issue

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.