मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिवप्रताप दिनाचा सोहळा; उदयनराजे भोसले गैरहजर राहणार?

किल्ले प्रतापगडावर ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आणि झेंड्याचे पूजन केलं. संपूर्ण प्रतापगड भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिवप्रताप दिनाचा सोहळा; उदयनराजे भोसले गैरहजर राहणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 9:39 AM

सातारा: किल्ले प्रतापगडावर आज 365वा शिवप्रताप दिन आहे. या शिवप्रताप दिनाच्या सोहळ्या निमित्त प्रताप गड सजला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसलेही यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यामुळे उदयनराजे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यातच राज्य सरकारने राज्यपालांचा साधा निषेधही न नोंदवल्याने उदयनराजे भोसले या सोहळ्याला उपस्थित न राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किल्ले प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिनास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले जिल्हयातील इतर आमदार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांना निमंत्रण आहे. पण त्यांच्या उपस्थित राहण्याबाबत साशंकता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

किल्ले प्रतापगडावर ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आणि झेंड्याचे पूजन केलं. संपूर्ण प्रतापगड भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आला आहे. तसेच गडावर विद्यूत रोषणाईही करण्यात आली आहे.

त्यामुळे संपूर्ण गड परिसर भगवामय झाला आहे. तर पालखीच्या भोईंनी शिवकालीन पोषाख करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे.

प्रतापगडावर छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी उंब्रजवरून असंख्य सायकल स्वार आले आहेत. सायकलस्वारांनी इथे तयार केलेल्या रस्त्यांची केली स्तुती केली आहे. छत्रपती शिवराय त्या काळात गड कशा पद्धतीने सर करत असावेत? त्यांचं अश्वधन गडावर कसं जात असावं? याचा सायकलवरून जाऊन तरुणांनी अनुभव घेतला. शिवप्रताप दिन हा आमच्या जिवाभावाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया या सायकलस्वार तरुणांनी दिली आहे.

अफजलखानाच्या कबरीच्या बाजूला असलेलं अनधिकृत बांधकाम सरकारने हटवलं. त्याबद्दल इथल्या जनतेने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं आहे. अनधिकृत बांधकाम हटवल्याने हा परिसर मोकळा झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.