नांदेडमध्ये अमित शहा यांची लवकरच सभा, भाजप लागली लोकसभेच्या तयारीला

या शक्ती प्रदर्शानाच्या तयारीला भाजप कार्यकर्ते लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केल्याचे यातून दिसतंय.

नांदेडमध्ये अमित शहा यांची लवकरच सभा, भाजप लागली लोकसभेच्या तयारीला
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 3:32 PM

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : येत्या 10 जून रोजी नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेला पन्नास हजारांहून अधिकचे लोक उपस्थित राहतील, असा दावा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय. शहा यांची सभा ज्याठिकाणी होणार आहे त्या जागेचे भूमिपूजन आज खासदारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. शहरातील अबचलनगर भागातील खुल्या मैदानात ही सभा होणार आहे. त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आलीय.

भाजप लागली लोकसभेच्या तयारीला

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्ष पूर्ण झालेत. त्या निमित्ताने नांदेडमध्ये अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आलीय. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात नांदेडला काय काय मिळाले याची उजळणी या निमित्ताने होणार आहे.

मात्र प्रत्यक्षात भाजप या सभेच्या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे. या शक्ती प्रदर्शानाच्या तयारीला भाजप कार्यकर्ते लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केल्याचे यातून दिसतंय.

हे सुद्धा वाचा

नांदेडमध्ये भाजपला गटबाजीने पोखरले

नांदेडमध्ये भाजपचे चार आमदार आणि एक खासदार आहे. मात्र खासदार वगळता अन्य तिन्ही आमदार पक्षवाढीच्या कामात कधीही अग्रेसर दिसले नाहीत. किनवटचे आमदार भिमराव केराम मध्यंतरी दोन वर्षे आजारी होते. त्यामुळे ते कधी किनवट वगळता बाहेर आलेच नाहीत.

मुखेडचे तुषार राठोड हे आमदाराकीचा अमरपट्टा घालून आल्याच्या थाटात वावरत असतात. नायगावचे आमदार राजेश पवार यांना तर आपल्या विधानसभा क्षेत्रातील सगळी गाव माहीत आहेत की नाही, अशी शंका येते. कारण पवार कायम मुंबई-पुण्यातच व्यस्त असतात.

खासदार प्रताप पाटील यांचे एकटा चलो रे

केवळ दैव बलवत्तर म्हणून विधान परिषदेची संधी मिळालेले राम पाटील आपलं गाव रातोळी सोडलं तर कुठेच प्रभाव पाळू शकलेले नाहीत. या चारही आमदारांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिलेलं नाही. तर खासदार असलेल्या प्रताप पाटील एकला चलो रे म्हणून पक्षाचे कार्यक्रम पुढे नेतात.

त्याउलट नांदेडमध्ये महाविकास आघाडीचे एकहाथी नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. गत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने चव्हाण आणखीन दक्ष झालेत. त्यामुळे चव्हाणांच्या प्रभावापुढे भाजप कितपत टिकू शकते असा प्रश्न आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.