सांगली मिरजेत पुनर्विवाहाचा अनोखा विवाह सोहळा, 66 वर्षांची आणि 79 वर्षांच्या आजीने बांधली लगीनगाठ

या विवाहाला बेघर केंद्रातील समदुःखी महिला पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. वधू शालिनी पाषाण पुणे येथील आहेत आणि निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे हे सांगलीच्या तासगाव येथील कवठेएकंद येथील आहेत. यावेळी ज्येष्ठ वधू-वरांचे समुपदेशन करण्यात आले.

सांगली मिरजेत पुनर्विवाहाचा अनोखा विवाह सोहळा, 66 वर्षांची आणि 79 वर्षांच्या आजीने बांधली लगीनगाठ
सांगली मिरजेत पुनर्विवाहाचा अनोखा विवाह सोहळा
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 10:38 PM

सांगली : सांगलीच्या मिरज येथील आस्था बेघर महिला केंद्रात एक आगळा वेगळा विवाह संपन्न झाला. यापूर्वी अनाथ निराधार मुलींचे विवाह झालेले आहेत. परंतु बेघर केंद्रातील आश्रित असलेल्या 66 वर्षाच्या शालन यांचा 79 वर्षीय दादासाहेब साळुंखे यांच्याशी विवाह संपन्न झाला. एका बेघर वृद्धाला आसरा देण्याचा आनंद सोहळा संपन्न झाला आहे. वयाचे बंधन झुगारून, पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Unique Remarriage Ceremony at Sangli Miraj, 66-year-old and 79-year-old Grandmother tied the knot)

शालिनी यांच्या पतीचे आणि मुलाचे अकाली निधन झाल्यानंतर जीवनाची फरफट होत होती. महापालिका बेघर केंद्रात आधार शोधत 66 वर्षाच्या शालिनी आल्या होत्या. तर दुसरीकडे निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे वय वर्षे 79 यांच्याही पत्नीचे निधन झाले होते. मुलांचे विवाह झाल्यानंतर मुले आपापल्या प्रपंचात मशगुल झाल्याने दादासाहेब याच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. वाढतं वय आणि वेळेवर पोटाला मिळत नाही. पुढील आयुष्यात पर्याय शोधण्यासाठी पुनर्विवाहाची सहमती घेतली. वधुच्या शोधात असताना जीवनाची सोबती बेघर केंद्रात सापडली आणि एकमेकांचे विचार सुख दुःख वाटून घ्यायचा निर्णय घेतला आणि मुहूर्त ठरला.

विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक

या विवाहाला बेघर केंद्रातील समदुःखी महिला पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. वधू शालिनी पाषाण पुणे येथील आहेत आणि निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे हे सांगलीच्या तासगाव येथील कवठेएकंद येथील आहेत. यावेळी ज्येष्ठ वधू-वरांचे समुपदेशन करण्यात आले. समाज सुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या फोटोला पुष्पहार आणि वृक्षाला पाणी घालून, फुलांच्या अक्षदा टाकण्यात आल्या. परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण व कालबाह्य झालेल्या पद्धतीला फाटा देऊन, वयाचे बंधन झुगारून, पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Unique Remarriage Ceremony at Sangli Miraj, 66-year-old and 79-year-old Grandmother tied the knot)

इतर बातम्या

राज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र; नोंदणीचा शासन निर्णय जारी

नाशिक पालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार; शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा गोची

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.