unseasonal rains : बेळगावात अवकाळी पावसाचा तडाखा; झाड कोसळून एकाचा मृत्यू

 बेळगाव (Belgaum) परिसरात अवकाळी पावसाने (unseasonal rains) तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पवासात (rains) प्रचंड वित्तहानी झाली आहे. तसेच अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू देखील झाला आहे. विजय यल्लाप्पा कोल्हापूरे वय 63 असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

unseasonal rains : बेळगावात अवकाळी पावसाचा तडाखा; झाड कोसळून एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 7:38 AM

बेळगाव : बेळगाव (Belgaum) परिसरात अवकाळी पावसाने (unseasonal rains) तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पवासात (rains) प्रचंड वित्तहानी झाली आहे. तसेच अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू देखील झाला आहे. विजय यल्लाप्पा कोल्हापूरे वय 63 असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विजय कोल्हापूरे हे  क्लब रोड परिसरातून आपल्या दुचाकीवर निघाले होते. ते बापट गल्ली परिसरात आले असता त्यांच्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली. या अपघातामध्ये ते जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अवकाळी पावसामुळे बेळगावात प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या या विद्युत वाहक तारांवर पडल्यामुळे निम्म्याहून अधिक शहराचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे शहराच्या अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले.

दुचाकींचे नुकसान

जिल्हा रुग्णालया समोरील नागशंती शोरूम समोर लावण्यात आलेल्या वीसहून अधिक दुचाकींचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. याठिकाणी काही दुचाकी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी लावण्यात आल्या होत्या, तर काहींनी पावसाला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी दुचाकी लावून पाऊस लागणार नाही याची दक्षता घेतली. मात्र पावसाला सुरुवात झाल्यानंतर  काही वेळात वाऱ्यामुळे या ठिकाणी मोठा वृक्ष उन्मळून पडला हा वृक्ष तिथे उभ्या केलेल्या दुचाकींवर कोसळल्याने या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक दुचाकी या झाडांच्या फांद्याखाली दबल्या गेल्या. तसेच रस्त्यावर देखील ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याचे दिसून आले.

फळ बागांना फटका

वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने शहरी भागात तर प्रचंड नुकसान झालेच मात्र , ग्रामीण भागात देखील पावसाचा मोठा फटका बसला. ग्रामीण भागात या अवकाळी पावसाचा मोठा फटका फळ बागांना बसला आहे. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे बेळगाव शहर आणि परिसरात मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. दुचाकींचे नुकसान झाले. तसेच या घटनेत एक जणाला आपला प्राण देखील गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या

Sagwan Farming : या झाडाची लागवड करून झटपट व्हा श्रीमंत, काही वर्षांतच बनणार करोडपती !

today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाचे दर वाढले, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे दर

SHARE MARKET: सेन्सेक्स 700 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांचा पाय खोलात, 2 दिवसांत 6 लाख कोटींवर पाणी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.