विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात टोलेबाजी; यावरून हा सल्ला असल्याचे सांगताच हास्यविनोद

राष्ट्रपीता महात्मा गांधी स्वतः टोपी घालतं नव्हते. इतरांना टोपी घालण्याचा आग्रह करत असत. मी मासे खात नसलो, तरी खाणाऱ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी निश्चितपणे करतो.

विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात टोलेबाजी; यावरून हा सल्ला असल्याचे सांगताच हास्यविनोद
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 10:03 AM

चंद्रपूर : चंद्रपुरात मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील टोलेबाजी रंगली. शाकाहारी असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून वडेट्टीवारांनी मंचावरील सर्वांनी मांसाहार सुरू केला पाहिजे असे वक्तव्य केले. मात्र लगेच मुनगंटीवार यांना वगळून हा सल्ला असल्याचे सांगताच कार्यक्रमात हशा पिकला. आपल्या भाषणात मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मी शाकाहारी असलो तरी महात्मा गांधींची प्रेरणा घेणारा असल्याचे वक्तव्य केले. गांधीजी कधीही टोपी घालत नसतं. मात्र इतरांना ती घालण्याचा आग्रह करीत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. मी शाकाहारी असलो तरी मत्स्यव्यवसाय विभागाचा मंत्री म्हणून खवय्यांची सोय होईल. याकडे लक्ष पुरवणार असल्याचे मिश्कील उत्तर मुनगंटीवार यांनी दिले.

मत्स्य खाण्याचे फायदे सांगितले पाहिजे

विजय वडेट्टीवार म्हणाले, मंचावरच्यांनी दुसऱ्याला मासे खा असे सांगण्यापेक्षा मंचावरच्या सगळ्यांनी मासे खाणे सुरू केले पाहिजे. मग, हा व्यवसाय वाढेल. सुधीरभाऊ तुम्हाला म्हणत नाही. कारण तुम्ही खात नाही. पण, मत्स्य खाण्याचे फायदे काय असावेत, हे सांगितलं पाहिजे. यावेळी मंचावर मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांना पाहूनच विजय वडेट्टीवार यांनी हा टोला लगावला.

खाणाऱ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतो

विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला मस्त्यपालन विभाग दिला. मी अर्ध्या तासात फोन करून सांगितलं. मी मासे खात नाही. त्यामुळे हा विभाग तुम्ही काढून घ्या. त्या मोबदल्यात मला दुसरा कोणताही विभाग दिला नाही. तरी काहीही वाटणार नाही. मी मासे खात नाही. म्हणून मला हा विभाग देऊ नका. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मंचावरील सर्वांनी मासे खाल्ले पाहिजे. पण, मी मासे खात नाही. राष्ट्रपीता महात्मा गांधी स्वतः टोपी घालतं नव्हते. इतरांना टोपी घालण्याचा आग्रह करत असत. मी मासे खात नसलो, तरी खाणाऱ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी निश्चितपणे करतो, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.