Video Akola Police | गावातील शेती, दारु दुकानाचा वाद; अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
डिझेल अंगावर टाकल्यानं त्याचा दर्प येत होता. अशात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली. पाण्यानं त्याला स्वच्छ केले. त्याच्या अंगावरील डिझेलची वास निघून जाईपर्यंत त्याला पाण्याने चांगलेच धुतले.
अकोला : अकोल्यात आज दुपारच्या सुमारास युवकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेही अकोला पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) कार्यालयासमोर. अंगावर डिझेल टाकले. आता तो स्वतःला पेटविणार एवढ्यात पोलिसांची एंट्री झाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळं युवकाचे प्राण वाचले. राजंदा (Rajanda) येथील 30 वर्षीय मयूर हरिभाऊ काळे (Haribhau Kale) असं या युवकाचं नाव आहे. गावातील शेतीचा वाद आणि दारू दुकानाच्या वादातून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. पण नेमके कारण समजू शकले नाही. सिटी कोतवाली पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे.
गावातील शेतीचा वाद
हरीभाऊ हा मूळचा राजंदा येथील रहिवासी. गावात काही दिवसांपासून शेतीचा वाद आहे. शिवाय दारू दुकानावरून भानगड सुरू आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार होती. पण, याची दखल का घेतली जात नाही, याचा राग हरिभाऊला आला. त्यातून त्यानं हा प्रकार केल्याचं बोललं जातंय.
पाहा व्हिडीओ
डिझेल अंगावर टाकून पेटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकोल्यातील युवकाला पोलिसांनी स्वच्छ धुऊन काढले. pic.twitter.com/aKYmV2tzsz
— Govind Hatwar (@GovindHatwar) May 6, 2022
पोलिसांनी घालून दिली अंगोळ
दुपारची वेळ. अकोल्यात उन्ह चांगलीच तापते. यात या युवकानं गोंधळ घातला. त्यामुळं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. डिझेल अंगावर टाकल्यानं त्याचा दर्प येत होता. अशात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली. पाण्यानं त्याला स्वच्छ केले. त्याच्या अंगावरील डिझेलची वास निघून जाईपर्यंत त्याला पाण्याने चांगलेच धुतले. त्यामुळं तो स्वच्छ झाला. त्यानंतर त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, या अकस्मात घटनेमुळं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.