पंकजा मुंडेंचे पंख छाटले, खडसेंना बाद केलं, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं; शिवसेनेची टीका

भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. (vinayak raut)

पंकजा मुंडेंचे पंख छाटले, खडसेंना बाद केलं, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं; शिवसेनेची टीका
vinayak raut
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 12:26 PM

सिंधुदुर्ग: भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसांनी केल्याची टीका शिवसेनेने केली आहे. (vinayak raut taunt devendra fadnavis over pankaja munde)

शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी भाजपमधील धुसफुशीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

फडणवीसच जबाबदार

ओबीसी समाजाला आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा आधारवड म्हणून मुंडे कुटुंबीयांकडे पाहिजे जाते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजा यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले आहेत. त्याचबरोबर एकनाथराव खडसे यांना बाद करून टाकलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे होते, त्या सर्वांना फडणवीसांच्या माध्यमातून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. आजही भाजपने पंकजा मुंडेना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर फेकून दिलं आहे, असा सणसणीत आरोपही त्यांनी केला आहे.

शिवसेनेचा हिसका राणे जाणून

भाजपाने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल. नारायण राणे यापूर्वी मंत्री असताना सुद्धा त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव राणेंनी घेतलेला आहे, असं सांगतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत राणेंकडून काही फायदा होणार नाही. मागच्या 30 वर्षांपासून मुंबईत शिवसेना जे काम करते आहे, त्या विश्वासावर पुनश्च एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी 2024मध्ये मुंबईवर भगवा फडकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (vinayak raut taunt devendra fadnavis over pankaja munde)

संबंधित बातम्या:

नितीन राऊत, पटोले वाद राहुल गांधींच्या दरबारात?, थोरात, राऊत दिल्लीत दाखल!

“राणेंची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ खाते सांभाळण्याची, कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”

कराडांना मंत्रीपद म्हणजे वंजारी समाजात फूट, पंकजांना संपूर्ण खतम करण्याचा डाव!

(vinayak raut taunt devendra fadnavis over pankaja munde)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.