कोरोना नियमांचे उल्लंघन, तुळजाभवानीच्या 3 उपदेवतांची मंदिरे सील

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरालागत असलेल्या 3 उपदेवतांची मंदिरे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत गर्दी केल्याने तहसिलदार सौदागर तांदळे यांनी सील केले आहेत.

कोरोना नियमांचे उल्लंघन, तुळजाभवानीच्या 3 उपदेवतांची मंदिरे सील
तुळजा भवानी मंदिर
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 9:00 AM

मुंबई : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरालागत असलेल्या 3 उपदेवतांची मंदिरे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत गर्दी केल्याने तहसिलदार सौदागर तांदळे यांनी सील केले आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या मंदिराची स्वतः पाहणी केल्यानंतर गर्दी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. (Violation of Corona rules, sealing temples of 3 temle of Tulja Bhavani )

तुळजाभवानीच्या उपदेवतांच्या मंदिरात गर्दी

कोरोना संसर्गाचा अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने अनेक भाविक तुळजाभवानी देवीच्या महाद्वाराचे व मंदिर कळसाचे दर्शन बाहेरून घेतात मात्र तुळजाभवानी मंदिर परिसर शेजारील उपदेवी देवतांची मंदिरे मात्र खुली असल्याने या भागात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती.

सूचना देऊनही कोरोना नियमांचं उल्लंघन

तुळजाभवानी मंदिर लगत असलेल्या अन्नपूर्णा देवी , टोळ भैरव व मातंगी देवी मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने वारंवार तोंडी सूचना देऊनही इथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व उपाययोजनाची पायमल्ली होत असल्याने तहसिलदार तांदळे यांनी ही 3 ही मंदिरे तात्काळ सील केली आहे.

देवीदेवतांच्या दैनंदिन धार्मिक विधी करण्यासाठी प्रशासनाकडून रजिस्टर ठेवलं जाणार

तुळजाभवानीच्या उपदेवतांची मंदिरे सील केली असली तरी देवीदेवतांच्या दैनंदिन धार्मिक विधी करण्यासाठी प्रशासनाने एक रजिस्टर ठेवणार आहे ज्यात कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी मंदिरात येताना जाताना पूजारी यांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही धार्मिक भावना दुखावली जाणार नाही , पुजाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

भाविकांनी कोरोनाचं गांभीर्य ओळखा

हिंदू धर्मीय बरोबरच इतर धर्माचे प्रार्थना व धार्मिक स्थळे सुद्धा कोरोना नियमांमुळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. भाविकांनी कोरोनाचं गांभीर्य पाळून शासनाला सहकार्य करावं, अशी अपेक्षा शासन प्रशासन व्यक्त करत आहे.

(Violation of Corona rules, sealing temples of 3 temle of Tulja Bhavani)

हे ही वाचा :

तुळजापूरच्या आई भवानीचं प्राचीन मंकावती तिर्थकुंडच हडप केलं, स्थानिक भाजप नेत्याचा प्रताप

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.